पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० लो० टिळकांचे चरित्र भाग १ झाली. ही गोष्ट म्हणजे युरोपातील महायुद्धाला ता. ४ आगष्ट १९१४ रोजी सुर- वात झाली होय ! या गोष्टीचा परिणाम टिळक व सरकार या दोघावर दोन प्रकारचा झाला. हे युद्ध म्हणजे इंग्रज सरकारावर फार मोठे संकट होते ही गोष्ट महशूर आहे. या संकटामुळे जितक्या निरनिराळ्या लोकांची आपल्याला सहानु- भूति मिळेल तितक्यांची मिळवावी अशी सरकाराला सहजच इच्छा उत्पन्न झाली. महायुद्ध जुंपल्यामुळे हिंदुस्थानात केवळ बंडच होईल अशी भीति सरकाराला नव्हती. कारण तशी असती तर हिंदुस्थानातले गोरे लष्करच काय पण बरेचसे काळे लष्करहि हिंदुस्थानाबाहेर पाठविण्यात आले ते पाठविले नसते. पण अशा संकटकाळी प्रत्यक्ष बंडाची भीति नसली तरी सहानुभूतीने जे समाधान मिळते ते सरकारासारख्यालाहि नको होते असे नाही. बंड नाहीच पण एरव्हीची चळवळहि कोणी फारशी करू नये असे सामोपचाराने घडविता आले तर तो मुत्सद्दी- पणाच ठरणार होता. तेव्हा मुंबई सरकारने हस्ते परहस्ते असा डाव टाकला की, टिळकांच्या दारावरचा पहारा उठवून ता. २५ जूनचा हुकूम परत घेण्याला आम्ही तयार आहो पण उलट टिळकानीहि मन थोडे मोठे करून सरकारच्या या संक- टाच्या वेळी त्याना सहानुभूतीपर उद्गार काढावे म्हणजे परस्पर हिशेब मिटला. (३) टिळकांचा जाहीरनामा इकडे टिळकांचीहि मनस्थिती यावेळी कशी असेल याचा थोडासा विचार करू. England's difficulty is our opportunity हे ब्रीदवाक्य त्यानी आपल्या मनावर नेहमी कोरून ठेवले होते. पण या संधीचा उपयोग करून घेण्याचेहि प्रकार असू शकतात. हिंदुस्थानात बंडाची खरोखरीच तयारी असती तर संधीचा फायदा घेण्याचा प्रकार वेगळा ठरला असता. पण तशी तयारी कोणतीच नव्हती. लोकांच्या मनाची नाही व साधनाचीहि नाही. अर्थात् हा फायदा घेण्याचा दुसरा प्रकार म्हटला म्हणजे सरकारला सहानुभूति दाखवून त्याच्या मोबदला काय मिळेल ते उचलावयाचे. अखेर पुणे कलेक्टरशी वाटाघाट होऊन ता. २७ आगष्ट रोजी टिळकानी एक जाहीरपत्रक काढले. ते ३० ऑगस्टच्या मराठ्यात व ता. १ सप्टें- बरच्या केसरीत प्रसिद्ध झाले. ते येणेप्रमाणे. "सध्याच्या काळची परिस्थिति नेहमी च्याहून निराळी असल्यामुळे या प्रसंगी सरकाराबद्दल माझी भावना कशी आहे यासंबंधी कसल्याही प्रकारचा गैरसमज असल्यास तो दूर व्हावा, या हेतूने खाली लिहिलेला मजकर प्रसिद्ध करण्यासाठी मी आपणाकडे पाठवीत आहे. माझ्या वाड्यांत गणपत्युत्सवासंबंधाने माझी स्नेही मंडळी परवा जमली असता त्यास उद्देशून मी जे भाषण केले त्यात हेच विचार मी प्रदर्शित केलेले आहेत. तथापि ते विचार त्या- पेक्षाही अधिक प्रसिद्ध होणे मला इष्ट वाटत असल्यामुळे मी हे पत्र आपणास लिहीत आहे. मी पुण्यास सुखरूप परत आलो म्हणून माझे अभिनंदन करण्यासाठी माझे घरी आलेल्या गृहस्थास उद्देशून दोन महिन्यापूर्वी मी जे भाषण केले त्यात असे