पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो० टिळकांचे चरित्र भाग ४ विधानानी आपली बेअब्रू झाली असे टिळकांचे म्हणणे होते आणि ज्यूरीने असा निकाल दिला की त्या विधानानी तुमची बेअब्रू झाली हे म्हणणे समर्थनीय नाही. दोन्ही प्रकरणात टिळकाना उलट तपासणीचे दिव्य करावे लागले. पण या उलट तपासणीपुरते पाहिले असता त्यातून ते शीरसलामत पार पडले असेच ती वाचून कोणीहि म्हणेल ! टिळकांचा प्रतिपक्षी चिरोलसाहेब यांचे नाव प्रसिद्धच आहे. लंडन टाईम्स पत्र हा विलायतेतील कॉन्झव्हेंटिव्ह किंवा प्रतिगामी राजकीय मताचा किल्लेकोट आणि इंग्लंडने सगळ्या जगावर साम्राज्य करावे हे त्याचे परराष्ट्रीय धोरण. या पत्राच्या परराष्ट्रीय खात्याचे एक चालक चिरोलसाहेब हे होते. त्यांच मुख्य काम परदेशात हिंडून व अधिकृत बातमीदार म्हणून टाईम्सला परराष्ट्रीय राजकारणा- संबंधी लेख लिहावयाचे. साम्राज्यवादी टाईम्सच्या धोरणात मुख्य भाग राष्ट्रीय चळवळी करणाऱ्या स्वातंत्र्यैच्छु समाजाची निंदा करणे हा होय. आणि बंगालच्या फाळणीनंतर जी प्रचंड राष्ट्रीय चळवळ हिंदुस्थानात झाली तिचे समालोचन करून बातमीपत्रे पाठविण्याकरिता चिरोलसाहेबाना इकडे पाठविण्यात आले होते. वास्त- विक चिरोलसाहेबाना एकहि देशी भाषा बोलता येत नव्हती. आणि इतर वर्त- मान पत्रांच्या बातमीदारांच्या रीतीप्रमाणे हे समाजात शिरून निरनिराळ्या मतांच्या लोकांच्या गाठी घेऊन बातमीपत्रे लिहावी तशी लिहीत नसत. त्यांचा भर मुख्यतः सेक्रेटरियट मधील कागदपत्रांचे रेकार्ड पोलिसांचे रिपोर्ट व प्रमुख अधि- कायाशी मारलेल्या शिळोप्याच्या गप्पा यावर असे. त्यातूनहि प्रस्तुतच्या खेपेत त्याना एक मोठेच घबाड लाधले होते. ते म्हणजे कोल्हापुरचे छत्रपती महाराज. हिंदुस्थानातील सर्व असंतोषाचे मूळ पुण्याच्या एका 'बामणा'त आहे हे त्यांचे मुंबई सरकारचे आणि करवीरच्या छत्रपतींचे अनुमान जुळल्यामुळे त्यानी या खेपेस लिहिलेल्या बातमीपत्राकरिता मुख्यतः मुंबई सरकारच्या पोलिटिकल खात्याचा आश्रय केला, पण त्याहीपेक्षा त्याना मोठा आधार कोल्हापूर दरबारचे नोकर भास्करराव जाधव प्रो. डोंगरे आणि दिवाण सबनीस यांचा मिळाला. मुख्य काम टिळक व केसरी यांच्याविरुद्ध तिखटमीठ लावून हकीकती सांगा- वयाच्या व जितके वाईट अप्रामाणिक हेतू टिळकांवर लादता येतील तितके लादावयाचे हे होते. अर्थात् भाडोत्री सरकारी नोकराकडून हे काम होण्यासारखे नव्हते येथे " जातीचेच पाहिजे " होते. व हे काम जाधवराव व डोंगरे यानी स्वतःच्या घरचे समजून केले. कोल्हापूर दरबाराने व मुंबई सरकाराने पुण्या- मुंबईतील लोकाकडून केसरी मराठ्याच्या वर्षवार फायली मिळविल्या व त्यातील शेलके उतारे काढून त्यांची इंग्रजी भाषांतरे करून चिरोल साहे- बाना दिली. खासगी भेटीत टिळकांचे हेतू समजावून सांगितले. त्यांच्या चळवळीवर द्वेषदृष्टीचा प्रकाश पाडला. आणि अशा रीतीने चिरोल साहे- बांच्या ग्रंथाची म्हणजे प्रारंभी टाईम्सला लिहिलेल्या बातमीपत्रांची पूर्वतयारी