पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ४ प्रस्तावना भाग ४ था चिरोल प्रकरण ( १ ) प्रस्तावना प्रस्तुत ग्रंथाच्या पूर्वखंडाच्या तिसऱ्या भागातील ताई महाराज प्रकरणाची हकीकत वाचकानी वाचलीच असेल. या दुसऱ्या खंडातहि अशाच एका मोठ्या प्रकरणाची हकीकत आम्हास द्यावयाची आहे. ही दोन्ही प्रकरणे टिळकाना गंडां- तरेच ठरली. पैकी एकातून टिळक अखेर यशस्वी होऊन बाहेर पडले व दुसऱ्या प्रकरणात त्यांच्या पदरी अपयश आले. अशाच रीतीने या दोन प्रकरणात इतर काही भेदस्थळे आहेत त्यांचाहि उल्लेख करणे जरूर आहे. ताई महाराज प्रकरण हे टिळकांवर अनिच्छेने कोसळले होते. चिरोल प्रकरण हे त्यानी आपल्या इच्छेने आपल्या अंगावर घेतले होते. एखादा मनुष्य उतारावर उभा असता वरून एखादा भरलेला गाडा त्याच्या अंगावर बसरावा व तो थोपवून धरता धरता हात पाय मोडून घेऊन इजा होऊन का होईना पण त्याला बाजूला सरून आपला जीव बचावता यावा, आणि मग आपला प्राण घेणारा गाडाच स्वतः कोलमंडून पडला मोडला त्याची हाडेनहाडे खिळखिळी झाली असे पाहण्याचे सुख व समाधान त्याला लाभावे असा प्रकार ताई महाराज प्रकरणाचा झाला. पण दुसरा एखादा मनुष्य वीरश्रीच्या हट्टाने किंवा फाजील आत्मविश्वासाने डोंगराच्या अंगावर चढून जाऊन त्याच्या डोक्यावर पाय देईन अशी महत्वाकांक्षा धरतो, पण त्या प्रयत्नात दमून जातो घसरून खाली पडतो आणि डोंगराला काही इजा न होता मनुष्या- चेच आंग ठेचाळून रक्त निघते तशी स्थिति टिळकांची या चिरोल प्रकरणी झाली. ताई महाराज प्रकरण हे खाजगी स्वरूपाचे होते म्हणून त्यात जसा टिळ- काना स्वतः प्रथम सगळा खर्च करावा लागला तसाच चिरोल प्रकरणातहि त्याना प्रथम सगळा खर्च स्वतः करावा लागला. आणि खटला बुडाला तेव्हा घरावर तुळशीपत्रच ठेऊन बाहेर पडण्याची वेळ होती. ह्या खटल्याचे स्वरूप सार्वजनिक आहे असे लोकानी जाणून ते वेळेवर टिळकांच्या मदतीला धावले ही गोष्ट वेगळी. दोन्ही प्रकरणात ब्रिटिश न्यायदेवतेशीच टिळकांचा संबंध होता. पैकी पहिल्या प्रकरणात प्रथम अपयश आले तरी पुढे यश आले असे पाहून याहि प्रकरणात तसेच यश येईल अशा समजुतीने टिळकानी पुढे पाऊल टाकले. पण ब्रिटिश न्यायदेवता झाली तरी ती स्त्री-स्वभावानुरूप चंचल असते, तिजवर डोळे मिटून विसंबता येत नाही अशी कबूली टिळकाना द्यावी लागली. ताई महाराज प्रकरणी जितके परिश्रम टिळकाना करावे लागले तितके मात्र या दुसन्या प्रकरणात सुदै- वाने करावे लागले नाहीत. तसेच चिरोल प्रकरणी अपयश आले तरी त्या अप- यशाचा परिणाम त्यांच्यावर मुळीच झाला नाही. चिरोलसाहेबांच्या अमुक एका