पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ लो० टिळकांचे चरित्र (३८) नारायणराव वैद्य यांचे टिळकाना पत्र भाग ३ नागपूर २८ नोव्हेंबर १९१८ तारीख ६ नोव्हेंबर रोजी सकाळी जबलपूर तुरुंगातून मी बाहेर पडलो. लगेच आपल्या दर्शनाला पुण्यास जावे असा संकल्प होता. पण विलायतेस गेला अशी बातमी समजली. तुरुंगात असता विशेषेकरून शिक्षासुनावणीच्या अगो- दरच्या काळात डोक्यात नाना तऱ्हेचे विचार येत असत व त्यामुळे मन उद्विग्न होत असे. परंतु गीतारहस्याच्या वाचनाने खरोखरीच समाधान होत असे. त्या दीड पावणे दोन महिन्याच्या अवधीत मी गीतारहस्य दोनदा वाचले. (३९) बी पी. वाडिया यांचे टिळकाना पत्र मद्रास २५ नोव्हेंबर १९१८ आपला हा एका परकी ख्रिस्ती देशात पहिलाच हिंवाळा आहे. शेक्स- पिअरने म्हटल्याप्रमाणे तो निराशेचा हिंवाळा किंवा असमाधानाचा हिंवाळा होणार नाही अशी आशा आहे. आपले योजलेले महदुदार कार्य सिद्धीस जाऊन आपण मायभूमीला लवकर परत यावे अशी प्रार्थना आहे. या देशात आपली कामगिरी दिवसेदिवस अधिकाधिक व्हावयाची आहे. आपल्या वियोगाने इकडे होमरूल व त्याचे पुरस्कत्ते यांची मने उत्कंठित झाली आहेत. आपल्या स्वार्थ- त्यागाबद्दल आपला जितका बहुमान करावा तितका थोडाच आहे. आणि त्याचे फल म्हणून आपणाला 'होमरूल' लवकर मिळावे अशी प्रार्थना आहे. (४०) जे. डब्ल्यू. थॉमस यांचे टिळकाना पत्र "इंडिया ऑफिस लंडन ८ नोव्हेंबर १९१८ पत्रावरील चुकलेल्या पत्त्यामुळे आपले पत्र हाती येण्याला अवधी लागली. बॅरिस्टर कोलास्कर आपल्याबद्दल लिहितात ते वाचून फारच संतोष झाला. आपण विद्वान पंडित या नात्याने आजवर जी कामगिरी केली तिला धरूनच आपली येथील योजना आहे यात शंका नाही. ज्यानी ज्यानी म्हणून तुमचे लेख व ग्रंथ वाचले आहेत त्याना हे कळून चुकले आहे की तुम्ही जुन्या संस्कृतीच्या अनेक विषयात फार लक्ष घालता व तुम्ही काढलेले सिद्धांत नवे व स्वतंत्र बुद्धीचे दर्शक आहेत. भांडारकर स्मारक प्रबंधावलीत तुम्ही लिहिलेले लेख मी वाचले ते फारच मनोरंजक आहेत. त्यात तुम्ही खाल्डियातील वेद व भारतीय वेद यातील शब्दसादृश्य दाखविले ते मोठे चित्ताकर्षक असल्याने मी तो निबंध फिरून वाचणार आहे. लंडन येथील रॉयल एशियाटिक सोसायटीत येऊन वाचनव्यव- साय करण्याला किंवा तेथील सभाना हजर राहण्यास तुम्हास काहीच अडचण पड- णार नाही. इतर संस्थासंबंधाने तुम्हाला माहिती हवी ती मी समक्ष भेटीत देईन. इंडिया ऑफिसच्या ग्रंथसंग्रहालयातील साधनानी तुमच्या विद्याविषयक कामाला जी कोणती मदत करिता येण्यासारखी असेल ती मी आनंदाने करीन.