पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७३ भाग ३ १९१७ व १९१८ सालामधील निवडक पत्रे कदाचित काँग्रेसला हजर राहून ठराव दुरुस्त करून घेण्याचा प्रयत्न होईल. पण ते शक्य दिसत नाही. तुमच्या तिकडल्या हालचालीविषयी काहीच वार्ता कळत नाही. बहुधा अनेक सार्वजनिक कामामध्ये तुमचा सर्व वेळ जात असेल. या आणीबाणीच्या वेळी तुम्ही विलायतेस जाण्याचे जे साहस केले त्याचे सार्थक झाले. तुमच्या कामगिरीला अगदी सोन्यासारखी संधि सापडली. तुम्हाला कोणती वर्तमानपत्रे मिळतात काही समजत नाही. काही विशिष्ट पत्रे बहुधा सेन्सारच्या तावडीतून सुटत नसतील. (३६) दादासाहेब खापर्डे यांचे टिळकाना पत्र अमरावती ३१ आक्टोबर १९१८ केळकरांची निवडणूक पुणे म्युनिसिपालिटीच्या अध्यक्षाचे जागी झाली हे वाचून आनंद झाला. यामुळे आता कौन्सिलात शिरण्यासंबंधाने त्यांच्यावर जी बंदी होती ती सहजच निघून जाईल. तसे झाल्यास मला एक मोठा सहकारी व साह्यकारी मिळेल. दिल्ली येथील काँग्रेसकरिता अध्यक्ष म्हणून तुमची निवडणूक सर्वानुमते झाली. पण तुम्ही आता येथे नाही तेव्हा तुमच्या जागी कोण बसवावा याची वाटाघाट व चळवळ सुरू आहे. बेझटबाईनी मदनमोहन यांचे नाव सुच- विले आहे. मी रवींद्रनाथ टागोर किंवा मोतीलाल घोष यांचे नाव सुचविले आहे. फ्रेंन्व्याइज कमिटीचे काम सुरू झाले आहे. त्यावर सुरेंद्रनाथ सत्र शास्त्री वगैरे लोक आहेत. पण काँग्रेसचा कोणीच नाही. यामुळे जुन्या गटांच्या गळ्यातच मतदारी पुन्हा पडते की काय नकळे! मी नागपूर येथे या कमिटीपुढे साक्षीला जाणार आहे. नंतर काँग्रेसला जाईन. त्यानंतर सवड असल्यास विलायतेलाहि येईन. (३७) खापर्डे यांचे टिळकाना पत्र अमरावती २० आक्टोबर १९१८ तुम्ही मुंबईहून गेल्या २३ तारखेला विलायतेस निघाला. तेव्हा मुंबईस येऊन भेटावे असे मनात होते. पण माझ्या नावावर कौन्सिलात काही ठराव वगैरे होते म्हणून येता आले नाही. सर वुइल्यम व्हिन्सेट यानी कौन्सिलात सांगि- तले की " फॅन्चाइज कमिट्यांचे काम संपेपर्यंत कोणास पासपोर्ट देत नाही. नंतर देऊ " म्हणून मी केळकर पाल वगैरेना तूर्त तिकडे निघता येत नाही. माझ्या ठरावावरून इकडे हत्यारांच्या नियमासंबंधाने एक कमिटी नेम- ण्यात आली आहे. प्रेस अॅक्टासंबंधाने माझा ठराव फसला. खुद्द आमची पार्टी अशी लहान आहे. इतरांची मदत केव्हा मिळते केव्हा मिळत नाही. कौन्सिलची मुदत वाढणार होती पण वाढत नाही म्हणतात.