पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२ लो० टिळकांचे चरित्र (३४) पोलॉक यांचे केळकराना पत्र भाग ३ मुंबईस स्पेशल काँग्रेसमध्ये सुधारणावर बहिष्कार घालण्यात येणार म्हणतात हे खरे का ? तसे न होईल तर बरे. या योजनेत पुष्कळ दोष आहेत. परंतु त्यांचे तत्त्व बरोबर आहे असे येथील लोक म्हणतात. शिवाय इक- डील स्थिति काय आहे हेहि लक्षात आणा. असे एकहि घर नाही की ज्यातील मनुष्य युद्धात पडला नाही. अशा वेळी तुमच्या कामात लक्ष घालतो कोण ? तरी पण माँटेग्यूला प्रधानमंडळाने हिंदुस्थानात धाडले व ते व चेम्सफर्ड यानी रिपोर्ट केला. अशा रीतीने लिवरल कॉन्झरवेटिव्ह यांचे एकमत तिकडे व इकडे झाल्या- मुळे आहे हे ठीक आहे अशा समजुतीने इकडील लोक योजनेला पाठिंबा देतील. तरीहि लॉर्ड कर्झन व सिडनहॅम यांचे विरुद्ध दिशेचे प्रयत्न होणार. म्हणून तिक- डील शिष्टमंडळे येऊन त्यानी तिकडची खरी हकिकत सांगितली पाहिजे, बेझंट- बाईची निवडणूक व टिळकांच्या भाषणाचे इकडे येणारे रिपोर्ट यानी आमच्या स्नेही मंडळीना थोडी भीतीच वाटू लागली आहे. येथील काँग्रेस कमिटीने काही करावे तर तिची येथील स्थिति फार वाईट आहे. तुमचे कोणी लोक इकडे पूर्वी आले नाहीत आणि जे आले ते म्हणजे सर सिंह बसू प्रभाशंकर पट्टणी अफताब अहमदखान यांच्याविषयी हिंदुस्थानात लोक प्रतिकूल आहेत असे दर्शविले जाते. यांत लाभ कोणता ? आयर्लंडातील घोटाळ्याने लॉईड जॉर्ज हे गांगरून गेले आहेत म्हणून हिंदुस्थानातलाहि घोटाळा पाहिला म्हणजे ते म्हणतील की हा आणखी त्रास नको. तात्पर्य मुंबईच्या सभेत जर काही भलता प्रकार झाला तर इंग्लंडात जे तुमचे आज स्नेही आहेत त्यानाहि तुम्ही गमावून बसाल. (३५) केळकरांचे टिळकाना पत्र मुंबई ७ डिसेंबर १९१८ तुमची तार पोचली. आमची कोणाचीहि पत्रे तुम्हास मिळाली नाहीत हे वाचून आश्चर्य वाटले, कदाचित् सरकारी सेन्सॉरशिप यापुढे कमी व्हावी. उमरावतीला लीगच्या वर्किंग कमिटीची बैठक आहे. तिकडे आम्ही जात आहो. पाच हजार पौंड बँकेतून दुसरीकडे ठेवण्याबद्दल माझी तार पोचलीच असेल. येथल्या जाहीर सभानी काँग्रेसच्या टेप्युटेशनवर व पीस कॉन्फरन्सवर तुमची निवडणूक केली आहे. शिवाय काँग्रेसने अध्यक्षाचे जागी तुमची निवडणूक केलीच आहे. तेव्हा कोणत्याहि तऱ्हेने तेथे तुम्हाला अडचण येणार नाही. पं. मालवीय यानाच यंदा अध्यक्ष करण्याचे ठरले. नेमस्तांची परिषद नुकतीच भरली होती. तिनेहि मुंबईच्या स्पेशल कॉंग्रेससारखेच ठराव पास केले आहेत. पण ठरावांचे भाषेमध्ये थोडा नाराजीचा व मतभेदाचा ध्वनि उमटतो.