पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ १९१७ व १९१८ सालामधील निवडक पत्रे ७१ (३१) टिळकांचे केळकरांना पत्र लंडन २८ नोव्हेंबर १९१८ ब्रिटिश काँग्रेस कमिटी संबंधाचा रिपोर्ट या सोबत पाठविला आहे. स्वागत मंडळाच्या द्वारे तो राष्ट्रीय सभेपुढे ठेवण्यात येईल. त्याचा नीट विचार विषय नियामक मंडळात करावा. ही कमिटी व इंडिया हे पत्र राष्ट्रीय समेला सोडून देऊन जवळ जवळ सरकारी मताचा अनुवाद करू लागली आहेत. नेम- स्ताना राग येईल म्हणून आम्ही रिपोर्टात सौम्य भाषा मुद्दाम वापरली आहे. पण खरे बोलावयाचे तर स्थिति लिहिली याहून फार वाईट आहे. रिपोर्टावर कस्तुरी रंग अयंगार आणि वसुमति पत्राचे संपादक घोष बाबू यांच्याही सह्या आहेत ही गोष्ट ध्यानात ठेवा. या दोघाना हिंदुस्थानातील वर्तमानपत्रांचे प्रति- निधि म्हणून सरकाराने इकडे पाठविले होते. त्यांचेही विचार आमच्यासारखेच आहेत. अर्थात् ब्रिटिश कमिटीला तूर्त पैसे पाठविणे श्रेयस्कर नाही. लॉईड जॉर्ज मुख्य प्रधान यांच्याशी माझा पत्रव्यवहार झाला त्याची प्रत पाठविली आहे. तिकडून पैसे येण्याची फार जरुरी आहे. कारण जवळच्या शिलकेंपैकी २००० पौंड वर पक्षाच्या निवडणुकीच्या कामाकरिता मी दिले. दिल्लीच्या सभेत काय होते ते खुलासेवार कळवा. (३२) सरला देवी यांचे केळकरास पत्र लाहोर ३० नोव्हेंबर १९१८ टिळकांची मुंबईस गाठ पडली तेव्हा त्यानी मला विचारले की, तुम्ही विलायतेत राजकीय विषयावर व्याख्याने पोर्ट देत नव्हते. आता देऊ लागले कानी विचारल्याची आठवण झाली. निष्क्रिय बसून राहण्यापेक्षा तो उद्योग द्यावयास जाल का ? पूर्वी स्त्रियाना पास- हेित असे समजते. हे ऐकून पूर्वी टिळ- असे वाटते की जमले तर जावेहि. येथे रा. ( ३३ ) सत्यमृताचे केळकरांना पत्र मद्रास ६ डिसेंबर १९१८ एम्. के. आचार्य हे कलकत्त्यास गेले आहेत. तेथून ते बंकिपुरला जातील. आपण पुष्कळ लोक मिळून दिल्लीला गेले पाहिजे. मुंबई स्पेशल कॉंग्रेसच्या ठरा- वाच्या मागे जाण्याचा काही लोकांचा विचार दिसतो. काँग्रेसचे प्रतिज्ञापत्रक बदलून घेतले पाहिजे. सरकारी जाहीरनाम्यात जर 'जबाबदारीचे स्वराज्य' असे शब्द आहेत तर काँग्रेसच्या उद्देशात 'हळुहळू सुधारणा' असे शब्द का असावेत ?