पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० लो० टिळकांचे चरित्र भाग ३ धाची माहिती टिळकाना लिहून ती तिकडे सांगण्याविषयी सुचवा. मेसापोटेमिया- मधील गोंधळ हे जसे माँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणाना एक निमित्त झाले तसेच वरील कत्तलहि जबाबदारीचे अधिकार मागण्याचे निमित्त करता येईल. ( २८ ) खापर्डे यांचे केळकराना पत्र उमरावती २६ ऑक्टोबर १९१८ टिळकांच्या जागी कोणाला निवडता असे मला विचारण्यात आले आहे. बाईनी पंडितजींचे नाव सुचविले आहे. पण मी रवींद्र टागोर मोतिलाल नेहरू आणि मोतीलाल घोस या क्रमाने नावे सुचविली आहेत. विजयराघवाचारियर हि चांगले गृहस्थ आहेत. त्यांचे व बाईचे बरे नाही असे दिसते. कसेहि असो. पंडितजी एकदा अध्यक्ष झाले आहेत. फिरून त्यानाच का नेमा ? (२९) बेझन्टबाईंचे केळकराना पत्र मद्रास ४ नोव्हेंबर १९१८ सर रवींद्रनाथ टागोर अध्यक्ष होण्याला मिळते तर गोष्ट सर्वोत्कृष्ट झाली असती. मी खूप खटपट केली. पण ती फुकट गेली. ते म्हणतात नुसती गर्दी पाहिली की मला कसेसेच होऊ लागते. मला ते नको. मदन मोहन निवडले गेले किंवा न गेले तरी ते आपल्या बाजूला राहतील. इतरांचीच भीति वाटते. तेव्हा आपल्या मताची छाप पडत चालली आहे हे उघड आहे. आम्ही आपली मते भीति व भीडमुरवत न धरता बोलून दाखवितो. नेमस्त आडपडद्याने बोलतात. बिल मंजूर होईपर्यंत एकविचारानेच वागले पाहिजे, मतवैचित्र्याला त्यानंतर जागा आहेच. (३०) बापूजी अणे यांचे केळकरास पत्र यवतमाळ २४ नोव्हेंबर १९१८ होम मेंबर यानी कौन्सिलात सांगितले की टिळक विलायतेस गेल्यावर त्यांची भाषणबंदी उठेल. ते वाचून आनंद झाला. तुम्हाला पासपोर्ट मिळण्याचीहि आशा या वरून दिसते. नारायणराव वैद्य दोषमुक्त होऊन सुटले. त्यांचे अभिनंदन करण्या- करिता त्याना यवतमाळास बोलाविले आहे. त्यांचा खटला आपला असे समजून होमरूल लीगने त्यांची काही तजवीज केली पाहिजे. शांतता परिषदेकडे आपले प्रतिनिधी म्हणून टिळकांना पाठविण्याची खटपट आपण केली पाहिजे. सरकार त्याना नेमणार नाही पण त्यांच्यामागे लोकमत किती आहे हे तरी दिसून येईल. सरकारने मतदारसंघ ठरवावा मग लोक टिळकानाच निवडून देतात हे दिसून येईल. अशा प्रकारचे ठराव जाहीर सभातून करण्याला मी प्रारंभ केला आहे.