पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ १९१७ व १९१८ सालामधील निवडक पत्रे ६९ वाच्छा सुरेंद्रनाथ यांचे पुढारीपण जसे मानीत नाही तसेच टिळक व बेझन्टबाई यांचेहि मानीत नाही. (२५) सी. पी. रामस्वामी अय्यर यांचे केळकराना पत्र मद्रास ३ ऑक्टोबर १९१८ मला व हसन इमाम याना व्हाईसरॉयसाद्देवानी काय सांगितले हे वर्त- मानपत्रातील तारावरून तुम्हाला कळलेच असेल. मला हे प्रत्यक्ष माहीत आहे की शिष्टमंडळाला निघण्याला परवानगी देण्याबद्दल व्हाईसराय यानी लॉईड जॉर्ज याना तारा केल्या होत्या. पण त्यांच्याकडून उत्तर आले की आमच्या हातातील काम संपले म्हणजे मग शिष्टमंडळाना येऊ देऊ. व्हाईसराय यानी असे स्पष्ट सांगितले की विल पार्लमेंट पुढे येण्याच्या आधी दोन महिने तरी पासपोर्ट देऊ. सरकारला पंक्तिप्रपंच करण्याला जागा राहू नये याकरिता होमरूल लीगचे प्रति- निधी हे काँग्रेसचेहि प्रतिनिधी असावे अशी शिष्टमंडळे बनविण्याची योजना करू या. (२६) केळकरांचे टिळकास पत्र पुणे २२ ऑक्टोबर १९१८ इन्फ्ल्युएन्झा आता थोडा कमी आहे. मित्रमंडळी खुशाल आहेत. राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदाकरिता तीन नावे पुढे आली आहेत. नेहरू टागोर व विजयराघव. टागोर बाबू मागे पाय घेत आहेत. तरी त्यांची समक्ष गाठ घेऊन काय ते कळवावे असे मी दासबाबू याना लिहिले आहे. विजयराघवाबद्दल मद्रासेकडेच दुमत आहे. आपण नेहरूना पसंत करता पण दिल्ली स्वागत मंड- ळाला मिळाले तर रवींद्रबाबूच हवेत. स्वागत मंडळात ठरावासंबंधाने मतभेद आहेत. स्वा० मंडळात आपल्या मताचे लोक आहेत त्याना पक्के करण्याकरिता मी इकडून कोणी कदाचित पाठवीन. नागपूरास नारायणराव वैद्यांचे अपील दासबाबूनी फार चांगले चालविले. अजून निकाल लागला नाही. आमच्या पासपोर्टस् संव- धाने सरकार अजून काही दाद देत नाही. फ्रेंचाईझ कमिटी मुंबईस डिसेंबरात येत आहे. त्याकरिता लीगतर्फे मी टिपण करीत आहे. (२७) कॅ. बेनन यांचे केळकराना पत्र कुलू-पंजाब २२ ऑक्टोबर १९१८ टिळक विलायतेस निघण्यापूर्वी त्यांचे मला पत्र आले होते. ते तिकडे गेल्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून तुम्हाला लिहित आहे. गेल्या जूनमध्ये जेलम येथे गरवाली ब्राह्मण शिपायांची कत्तल झाली. ती मोठी संशयास्पद असून कौ न्सिलात शर्मा यानी सेनापतीना त्यासंबंधी प्रश्न विचारले आहेत. तरी या संब-