पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ ३. सुटके नंतरची नजर कैद ९ याना प्रमुख जागी उभे करून त्याना माळा वगैरे घालून त्यांचा गौरव करून दाखविता कामा नये. भजनी लोकाना उद्देशून किंवा मेळ्याना उद्देशून मिरवणुकीत मध्येच उभे राहून कोणी व्याख्याने देऊ नयेत अगर भाषणे करू नयेत. वरील जाहीरनामा वाचला म्हणजे असे वाटते की टिळकांसंबंधी आदरबुद्धी दाखविण्याचे किती दरवाजे, किती दिंड्या, किती चोरवाटा, किती पाऊलवाटा असतील याचे संशोधन करून त्या सर्व कशा बुजविता येतील याचा विचार करून हुकूम लिहिण्यात, कल्पक पोलिस अधिकाऱ्याचा मेंदू पुष्कळच शिणला असला पाहिजे. स्वतः टिळकानी गणपतींच्या मिरवणुकीत जाऊ नये असे कलेक्टरसाहे- बानी सरकारच्या इच्छेवरून खाजगी पत्र लिहून टिळकाना कळविले होते व ते त्यानी या वर्षापुरते मान्यहि केले होते. पण टिळकांचे मुलगे मिरवणुकीत जाणार व तेथे त्यांना कोणी मुकाट्याने माळा घातल्या तरी तो सन्मान देखील अप्रत्यक्ष- पणे टिळकांचा व तो त्याना या आडमार्गाने पोचेल या भीतीने वरील हुकुमात टिळकांच्या मुलांचीहि नावे घालण्यात आली यावरून सरकारच्या हलक्या मनाची साक्ष कोणासहि पटणार आहे. पण प्रतिक्रियाही क्रियेइतकीच शक्तिवान असते हैं तत्त्व या ठिकाणी लागू पडले, आणि तो हुकूम आणि हा हुकूम मोडून दंडाच्या रकमानी लोकानी सरकारचा खजिना भरणे जरी सोयीचे नव्हते तरी टिळकांच्या मान्यतेत आता भर पडण्याची काही बाकी उरलेली नव्हती. सरकारी हुकूम निघाला म्हणून आहे ती मान्यता कमी होईल हा सरकारचा नुसता भ्रम होता. म्हणून त्यानी जितकी जितकी कल्पकता या बाबतीत अधिक चालविली तितका तितका लोकात त्यांचा उपहासच अधिक झाला. हा हुकूम पाळला जावा म्हणून उत्स वाच्या चालकानी आपली पराकाष्ठा केली. त्यामुळे जाहीरनाम्याविरुद्ध कोणी वर्तन केले नाही तथापि शेण भुईवर पडले आणि ते माती न घेता उठले तर ते शेण कसले ? या न्यायाने पोलिसानी एका वहिमी गृहस्थावर टिळक महाराज की जय असे ओरडल्याचा आरोप ठेवून त्याला भला मोठा दंड करविला व तो चोपून वसूल केला. , अशा प्रकारचे हुकूम काढणे हे सरकाराला जसे आपल्या ' इभ्रतीचे ' एक लक्षण वाटले तसेच टिळकानाहि तो एक अपमान व उपमर्द वाटला. आणि आपल्यावरील पहारा दूर व्हावा म्हणून त्यानी ती खटपट विलायतेस सुरू केली. ' कारण हिंदुस्थानात ती यशस्वी होण्याचा संभव कमी. पार्लमेंटचे सभासद केरहार्डी यांच्याकडे त्यानी सविस्तर हकीगतीचे पत्र लिहून पाठविले व त्यानी स्टेट सेक्रेटरी क्र्यू याच्याकडे लिहून तक्रार केली. लॉर्ड क्र्यू यानी लगेच कळविले की, मी मुंबई सरकाराकडे या प्रकरणी रिपोर्ट मागविला आहे व तो येताच मी फिरून तुम्हाला लिहीन. या पत्रव्यवहाराला सहजच महिना सवामहिना लागला. पण दरम्यान एक अकल्पित गोष्ट घडून आली त्यामुळे या प्रश्नाचा निकाल लवकर लागण्याला मदत