पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६ लो० टिळकांचे चरित्र (१४) सर सुब्रम्हण्यम् अय्यर याचे टिळकांस पत्र भाग ३ मद्रास १९ जुलै १९१७ आमच्या होमरूल लीगच्यातर्फे कुलपाच्या निशाणीचे हे जयचिन्ह मी तुम्हाला पाठवीत आहे. या आपल्या देशाकरिता ज्याना ज्याना म्हणून तुरुंगवास घडला त्याना त्याना है नजर करण्याचा आमचा विचार आहे. कुलपाखाली तुरुं- गाचे दरवाजे कोरले आहेत व गजात F. I. ही अक्षरे गुंतविली आहेत. त्याचा अर्थ " Fellowship of the Interned. " सामान्य पदके आम्ही पितळेची केली आहेत. पण तुमचे हे पदक मुद्दाम सोन्याचे करून पाठविले आहे. कारण तुमची योग्यता तशीच अनन्यसामान्य आहे. निस्वार्थाने तुरुंगवास सोसलेल्या लोकांचा असा सन्मान व्हावा हे जनतेला प्रियच आहे. आणि हे जयचिन्ह साधे असले तरी ते स्पृहणीय अशा बहुमानाचे आहे असेच ते स्वीकारणाराला वाटेल यात शंका नाही. (१५) बिपिनपाल यांचे टिळकाना पत्र कलकत्ता १८ सप्टेंबर १९१७ सुरेंद्र व भुपेंद्र यानी बेझंटवाई अध्यक्ष होऊ नयेत अशी खटपट चाल- विली आहे. प्रांतिक काँ. कमिटीच्या सभेत गोधळ झाला तो तुम्ही ऐकलाच असाल, ते लोक सभा सोडून गेल्यामुळे वैकुंठनाथ सेन यांच्या जागी रवींद्रनाथ टागोर यांची नेमणूक केली. यंदाची काँग्रेस कलकत्त्यास व्हावी अध्यक्ष बेझंट- बाई असाव्या व स्वागताध्यक्ष रवींद्रबाबू असावे असे इकडील लोकमत जोरदार आहे. पण येथून काँग्रेसच हलवावी असा प्रतिपक्षाचा डाव आहे. तरी ऑ. इं. काँ. कमिटीच्या सभेत आम्हाला तुमची सर्वस्वी मदत पाहिजे. दास चक्रवर्ती हिरेंद्र- बाबू व मी इतक्यानी तुम्हाला भेटण्याला तिकडे जावे असेहि ठरत आहे. (१६) मोतिलाल घोस यांचे टिळकाना पत्र काँग्रेसची जागा बदलण्याचे घाटत आहे आम्ही सर्वानी मिळून याला विरोध केला पाहिजे. कलकत्ता सप्टेंबर १९१७ असे ऐकतो हे काय ? तुम्ही महाराष्ट्र व वन्हाड नागपूर येथील ऑ. इं, काँ. कमिटीच्या सभासदाना भेटणे जरूर असेल तर केळकराना पाठवा. मी आमचाहि एक गृहस्थ बरोबर देईन. (१७) प्रो जगदीशचंद्र बोस यांचे टिळकास पत्र कलकत्ता तुम्हाला भेटण्याची व माझी शास्त्रसंशोधक संस्था तुम्हाला दाखवि ण्याची इच्छा फारा दिवसांची होती. ती पुरी होण्याचा आता योग दिसतो. तरी