पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ १९१७ व १९१८ सालामधील निवडक पत्रे ६७ येत्या शुक्रवारी इन्स्टीट्यूट पाहावयाला यावे अशी विनंति करीत आहे. त्या दिवशी मी एक व्याख्यानहि ठेवलेले आहे. (१८) सुब्रह्मण्य अय्या यांचे टिळकाना पत्र म्हैसूर १ फेब्रुअरी १९९८ आपले गीताभाष्य मराठी जाणणाऱ्या एका मित्राची मदत घेऊन वाचीत असतो. हल्ली मला गीतेची एक प्रत मिळाली आहे. तीत सव्वीस अध्याय असून गोभिलकृत गीतार्थसंग्रह त्यात आहे. सर सुब्रह्मण्य अय्यर यानी त्याला प्रस्तावना लिहिली आहे. हिंदुस्थानामध्ये एक ज्योतिष विद्यापीठ स्थापावे अशी माझी इच्छा आहे. आपल्या ज्योतिषाना भौतिक साधने कमी होती. तथापि ज्योतिष- संहिता वाचल्यावरून त्यांच्या कामगिरीबद्दल अभिमान वाटतो. हल्लीचे ज्योतिषी भविष्य वर्तवितात ती प्रायः खोटी ठरतात. तरी देखील अनेकांचा या विद्येवर विश्वास आहे. तुम्ही ही विद्या चांगली जाणता. तरी या माझ्या कार्यात साहाय्य करावे अशी विनंति आहे. (१९) रेवा संस्थान सेक्रेटरींचे टिळकाना पल रेवा ५ मे १९१८ उत्तर हिंदुस्थानात हिंदु सौरपद्धतीचे वर्ष व पंचांग सुरू करण्याचा दर- वारचा विचार आहे. हिंदी व इंग्रजी भाषेत यावर लिहिलेले एक योजनापत्रक आपणाकडे पाठवीत आहे. आपला अभिप्राय विचारावा अशी आज्ञा झाल्या- वरून लिहीत आहे तरी अभिप्राय कळवावा. (२०) के. सितारामराव यांचे टिळकाना पल मच्छलीपट्टण ७ मे १९१८ आपण आंध्र देशात येणार असे आंध्रपत्रिकेत वाचले व फार आनंद झाला. इकडे येण्याचे आपण पूर्वी अभिवचन दिलेच होते. आपण इकडे येणार ही बातमी वाचून एकंदर आंध्र देश आनंदित होईल. आंध्र देश हा काँग्रेसच्या कारभाराकरिता स्वतंत्र प्रांत मानावा की नाही असा वाद निघाला तेव्हा आपण आमची पाठ राखली याबद्दल आम्ही कृतज्ञ आहो. मद्रास येथे आंध्र समाजाने आपणाला मानपत्र दिले तेव्हा उत्तर देताना आपण सांगितले की महाराष्ट्रीय राजानी शेजारच्या आंध्र राज्यपद्धतीतील तपशीलाच्या अनेक गोष्टी उपयोगात आणल्या होत्या. हे ऐकूनहि कृतज्ञता वाटली. १९१४ साली आपली सुटका झाली तेव्हा आपणाला मी तार पाठविली होती. इकडची होमरूल लीग संस्था आपली वाट पहात आहे.