पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९१७ व १९१८ सालामधील निवडक पत्रे ६५ भाग ३ धंद्याकरिता नेलेली मेणाची चित्रे पाहून जात. यंत्राकडे कोणी पाहिले नाही. हल्ली ईश्वराच्या इच्छेने महायुद्धाची संधि आली आहे. अशा वेळी माझे हे यंत्र घरोघर चालू लागेल तर फार उपयोग होईल. वरबसल्या बायकानाहि आठ आणे मजूरी मिळेल. आमच्या घरचे या यंत्रावर आजवर पाचपन्नास हजार रुपये खर्च झाले आहेत. तरी हे यंत्र घेऊन ते थोडक्यात विकून कोणी त्याचा प्रसार करील तर पाहा. (११) वेझन्टबाईचे केळकराना पत्र मद्रास ७ जून १९१७ दडपशाहीचा पाय पुढे आहे. येथील गव्हर्नरांचे भाषण सिमला येथून हुकूम आल्याप्रमाणे झाले. त्याप्रमाणे इतर ठिकाणीहि भाषणे होतील. प्रथम मला अटक होईल मग इतराना. पुढील आठवड्यातच ही गोष्ट घडून येईल. कदाचित त्याच्या आधीहि. या गोष्टीची उघड चर्चाहि करू नये व सभा भरवू नयेत असाहि हुकूम निघण्याचा संभव आहे. हेतू हा की इकडील चळवळ विलायतेस कळू नये. अशा रीतीची मुस्कटदाबी झाली तर सर्व संपलेच म्हणावयाचे. (१२) विद्यार्थी गोविंद यांचे टिळकाना पत्र सागर ११ जून १९१७ येथील प्रायश्चित्त प्रकरण अद्यापि शांत झाले नाही. शुद्ध पक्षाची मंडळी शंकराचार्यांकडे धाव घेत आहे. बनारस येथे येऊन गेलेले शिवगंगा मठाचे आचार्य हे विरुद्ध निकाल देणार असे ऐकतो. भारत धर्म महामंडळ आम्हाला अनुकूल असून ते मंडळ आचार्यांचा निकाल मानणार नाही असे दिसते. तरी पूर्वी पत्रात लिहिल्या मुद्यावर आपण एखादी लहानशी शास्त्रव्यवस्था बांधून पाठविण्याची कृपा कराल तर बरे. नाही तर कोर्टात रुपये खर्च होतील व एक दोन बळी पडतील. (१३) वामनराव मुकादम यांचे टिळकाना पत्र गोधा १९ जून १९१७ आपणास त्रास द्यावयाचे जिवावर येते पण काय करणार ? आमची गुज- राय राजकारणात अजून मागे आहे. म्हणून परिषद भरवीत आहोत. गुजराथेची अशी वेगळी परिषद भरविण्याला आम्हाला मुंबईकर हरकत करीत आहेत. पण सिंध आपली वेगळी परिषद भरवितो तशी गुजराथेलाहि का असू नये ? मी मुंबईस समर्थ याना फिरून लिहीत आहे. तरी या बाबतीत आपणहि आम्हाला मदत करावी.