पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४ लौ० टिळकांचे चरित्र भांग ३ सल्ला आणि भरपूर मदत यांची अपेक्षा आहे. कॉंग्रेस व होमरूललीग यांचे मिळून मंडळ नेमावे ही तुमची कल्पना अंमलात येईल तर बरे होईल. (७) वि. ग. केतकर यांचे केळकराना पस नाशिक २० एप्रिल १९१७ शास्त्री यांचे अध्यक्षस्थान स्वीकारल्याचे पत्र आले आहे. परिषदेला क्रमांक कितवा द्यावा हा वाद डोकावत आहे. पण अजून जोर करीत नाही. शास्त्री लिहितात की मला मराठी भाषा समजत नाही तर मी वक्त्याना बोलावणे किंवा भाषणावर नजर ठेवणे वगैरे गोष्टी कशा करू ? याकरिता अध्यक्षाना मदत करण्याकरिता तुम्हाला उपाध्यक्ष म्हणून निवडावे अशी सूचना मंडळीत निघाली आहे. अशा गोष्टीला जुना दाखला नाही. पण आयत्या वेळी बनेल ते करू. (८) बॅपटिस्टा यांचे केळकराना पत्र मुंबई २ मे १९१७ मी नाशिकच्या प्रां. परिषदेला हजर राहणार आहे. यापुढे माझी सूचना अशी आहे की होमरूल लीगचे अध्यक्ष टिळकानी व्हावे नाहीतर तुम्ही व्हावे. कामाचा सर्व भर तुम्हा दोघावरच पडतो. मग हा मान देखील तुम्हालाच का असू नये ? मधुमेहाचे औषध टिळकानी पाठवितो असे लिहिले पण ते अजून मिळाले नाही. ( ९ ) राजाराम भट्ट लेले यांचे टिळकास पत्र बनारस ७ मे १९१७ आम्ही तीस पसतीस वर्षांपासून कलावतु घरी तयार करतो. त्या संबं- धाची साधने घरीच तयार केली आहेत. अलीकडे पंधरा वर्षे परदेशी कलावतु फार येऊ लागल्यामुळे इकडील धंदा बुडत चालला. प्रथम कमीत कमी दहा हजार भांडवल नवीन घालावे लागेल, याबद्दल पैसाफंड कमिटीला अर्ज केला आहे. तरी आपणहि शिफारस व मदत करावी. (१०) ग. रा. मराठे यांचे टिळकाना पल वसई ३ जून १९१७ माझ्या यंत्राची हस्तलिखित चोपडी वसईस परत पाठवावी. एका लग्न- समारंभात वन्हाडी कोण व यजमान कोण हे ओळखण्याला एका कल्पक गृहस्थाने वाटेत दगड ठेवल्याची गोष्ट आपणास माहीत असेलच. मीहि आपले यंत्र घेऊन अनेक प्रदर्शने व परिषदा हिंडलो व तेथे वाटेत ठेवलेल्या दगडासारखा यजमान हुडकून काढण्याचा उपयोग त्या यंत्राचा मला झाला. मोठमोठे लोक मी पोटाच्या