पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ १९१७ व १९१८ सालामधील निवडक पत्रे ६३ (४) मुंडले यांचे टिळकाना पल इस्लामपूर १२ मार्च १९१७ जुनी दडपशाही व तिचे परिणाम आपणास विदित आहेतच. व नवीहि पुनः सुरु होणार असा रंग दिसतो. तरी पुढे ही चळवळ कशी चालवावी याचा आपण काही विचार केला आहे काय ? होमरूल लीगची चळवळ जोरात आली म्हणजे सरकार पुनः तुम्हाला बाजूस काढून नेईल. मग पुढे तिची वाट काय व्हावयाची ? मला वाटते की नव्या चळवळीत पहिला हल्ला तुम्ही आपणावर घेऊ नये व नवीन माणसे पुढे आणून नवी घटना करावी. तीन किंवा चार माण- सांच्या हाती सर्व योजना द्यावी व कोणती चळवळ उघड करावी कोणती करू नये याची दिशा त्यानी दाखवावी. तुम्ही या घटनेचे अध्यक्ष व केळकर हे एक सभासद व चिटणीस असावेत. इतर प्रांतातील एक दोन माणसे घ्यावी. पोलिस लोक चिडवून आमच्या तापट लोकाना गोत्यात आणतात. तरी हे टाळण्याविषयी लोकाना समजून सांगितले पाहिजे. जेथे प्रतिकार करणे अपरिहार्य होईल तेथे मध्यवर्ती मंडळाने पुढे होऊन तो करावा. प्रत्यक्ष चळवळीत न पडता शांत मनाने बसून खोल विचार करणाऱ्यांचाहि एक वर्ग या घटनेत असावा व त्याच्या दिमतीला ग्रंथसंग्रह भरपूर असावा. तरी याविषयी मंडळी जमवून आपण अवश्य विचार करावा असे मला वाटते. सुचले ते लिहिले आहे. (५) वि. मो. महाजनी यांचे टिळकाना पत्र अकोला ३ मार्च १९१७ अभंगाचे नोटबूक पूर्वी आपणाकडे दिले ते परत पाठवावे व आपला अभिप्राय कळवावा. एकाचे म्हणणे असे की हे अभंग छापताना विषयवार द्यावे. दुसरे म्हणतात तसे केल्याने वाचकास कंटाळा येईल. विषयवार रचना न केली तर गोंधळ होणार. एक म्हणतात एका बाजूला अभंग व दुसऱ्या बाजूला भाषांतर असे छापावे. पण याला खर्च बराच येतो. म्हणून दुसऱ्याचे म्हणणे मूळ अभंग न देता नुसता अभंगार्थच द्यावा. पण असे केल्याने वाचकास आवड- णार नाही असेहि आहे. तरी आपला अभिप्राय यथावकाश जरूर कळवावा. (६) श्री. शास्त्री यांचे केळकराना पत्र मद्रास १७ एप्रिल १९१७ मी जोखमीचे काम पत्करले आहे. अजून काय विषय घ्यावे याचा विचार केलेला नाही. पुण्यास येताच लष्करभरतीसंबंधाने मी एक व्याख्यान देणार आहे. अद्याप आपली तरुण पिढी या कामी मागे घेत आहे. तरी तुमचा मनमोकळा टि० उ...१७