पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२ लो० टिळकांचे चरित्र परिशिष्ट भाग ३ [ १९१७ व १९९८ सालामधील निवडक पत्रे ] ( १ ) श्रीनिवास शास्त्री यांचे केळकरास पत्र मद्रास १ फेब्रुवारी १९१७ मी थोडा आजारी असल्यामुळे पुण्याकडे थोडासा उशीरा येणार आहे. समर्थ याजकडून पत्र आले त्यात तुमच्या अंदाजाप्रमाणेच आहे. तुम्ही व मुंबईची मित्रमंडळी यांच्या कृपेमुळे मला परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान मिळत आहे. फेब्रु- वारी मार्चमध्ये मी बहुधा दिल्लीस असेन. मुंबईची सुस्लीम लीग आपणाशी सहकारिता करील काय ? पुणे व लखनौ येथे तुमचे आमचे बोलणे झाले तेव्हा ती सहकारिता करील असा आमचा अंदाज होता. किंबहुना अशा हेतूनेच टिळकानी आपला टाईप केलेला मेमोरॅन्डम् मूळ तयार केला व तोच वाच्छा व मुंबई प्रां. कॉ. कमिटीच्या सभासदानी मान्य केला. कार्यकारी मंडळात कॉंग्रेस व मुस्लीमलीग या दोहो संस्थांचे प्रतिनिधी आले व त्यानी मिळून काम केले तर हिंदुमुसलमानांचे ऐक्य झाले हे खरे असे लोकाना वाटेल. (२) नटेशराच द्रवीड यांचे केळकरांना पत्र दिल्ली ११-२-१७ शास्त्री यानी तुमचे पत्र दाखविले. मला किती आनंद झाला म्हणून सांगू ! यापुढेहि आपणात असाच सलोखा राहील तर किती चांगले होईल ! त्यांचे माझे बोलणे झाले त्यात असे ठरले होते की राष्ट्रीय पक्ष एकमताने त्यास बोलावील तरच त्यानी जावे. इतर कित्येक गोष्टीवर तुमचा सल्ला व मदत पाहिजे. मी माझ्या बाजूने मदत करण्यास तयार आहे व तुम्हीहि आहाच. १९०५/०६ साली तुम्ही आम्ही मिळून खटपट केली ती फुकट गेली. सर्वानी मिळूनच हे काम केल्याशिवाय होणे नाही. कोणत्याहि एकाच पक्षाचे हित साधावे अशी माझी इच्छा नाही. उभय पक्षाना मिळून करता येण्यासारखे काम उभयतानी मिळून करावे. (३) माधवराव सप्रे यांचे केळकराना पत्र रायपूर २२-२-१९१७ महात्मा टिळक यांचे एक चरित्र हिंदीत लिहावे असा विचार आहे. तरी स्वतःची किंवा दुकानदाराकडून त्यांच्या चरित्रासंबधाने मिळतील तितकी छापील पुस्तके वगैरे पाठवावी. तुमच्या काही पुस्तकांची भाषांतरहि मला करावयाची आहेत तरी तीहि सर्व पाठवावीत.