पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो० टिळकांचे चरित्र भाग ३ पोचले होते. नोव्हेंबरच्या प्रारंभी प्राथमिक तह झाला. यामुळे इकडे हिंदुस्थाना- तहि अभिनंदने वगैरे रीतीप्रमाणे होत होती. इतक्यात लॉर्ड विलिंग्डन हे विला- यतेस जाण्यास निघाले तेव्हा रीतीप्रमाणे त्यांच्या स्मारकाची चळवळहि तुरू झाली. यातहि पूर्वीचाच अनुभव आला. जाहीर रीतीने सभा भरवून स्मारकाची सूचना मंजूर करून घेणे चालकाना अवश्य वाटले, म्हणून पोलिस रेल्वे व इतर निम- सरकारी खाती यांची मदत घेऊन सभा पार पाडण्याचे पुष्कळ प्रयत्न झाले. प्रथम स्मारकवाल्यानी मताधिक्याचा मोठा आव घातला. पण जिना हॉर्निमन व मुंबईचे होमरूलर यानी स्मारकाला विशेष जोराचा विरोध केला. व शेवटी मुंबईच्या टाऊन हॉलमध्ये स्मारकसभा भरण्याचे ठरले. सभा नागरिकांच्या विनंतिवरून शेरीफ यानी बोलाविली होती म्हणून ती थोडीशी त्यांच्या हाती होती. तथापि सभा जाहीर म्हणून वॅ. जिना यानी दोन हजार लोकांच्या सह्यांचा अर्ज शेरीफ- कडे पाठविला. आणि विरुद्ध बाजूच्या लोकाना बोलण्यास परवानगी दिली पाहिजे व मते मोजण्याची नीट व्यवस्था झाली पाहिजे असे आगाऊ विरोधी पक्षाकडून कळविण्यात आले. पण शेवटी गोष्ट वर्दळीवर आलीच. दंगा होणार म्हणून पोलिस बंदोबस्त आदल्या दिवसापासून ठेवला होता. प्रत्येक पक्षाचा असा प्रयत्न होता की सभेला आधी जाऊन शक्य तितक्या जागा अडवावयाच्या. सकाळी दहा वाजताच जिना वगैरे मंडळी सभेला गेली तो स्मारकपक्षाने निम्मी अधिक जागा अडविलेली दिसून आलो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जागा अडवून ठिय्या देऊन बसणे हे काम जिकीरीचे होते. तथापि आतल्या लोकाना खाण्या- पिण्यास पुरविण्याची व्यवस्था बाहेरच्यानी केली. स्मारकवाल्यानी दिनशा वाच्छा यांची अध्यक्षस्थानी निवडणूक करण्याचा ठराव पुढे आणला. हॉर्निमन यानी उपसूचना मांडली. पण ती न जुमानता वाच्छा हे खुर्चीवर जाऊन बसले. इतक्यात जिना हे प्लॅटफॉर्मवर जाऊन बोलण्याचा प्रयत्न करू लागले. त्याबरोबर सभेत दंगल सुरू झाली. हे पाहून पोलिस लोक आत शिरले व टाऊन हॉल खाली करा असे सर्वांना सांगू लागले. जिना यांनी सांगितले की 'सभा बरखास्त होईपर्यंत आम्ही येथून हलणार नाही. ' शेवटी पोलिसानी सभा बंद करण्याचा हुकूम दिला आणि सभा मोडता मोडताना थोडीशी मारामारी झाली. काही पार्शानी आपल्या जातीचा राग जिना यांच्यावर या वेळी काढून त्याना ढकलून दिले आणि ठोसे लगावले. परंतु होमरूलर लोकानी त्यांचे संरक्षण केले. अशा रीतीने मार देत व मार घेत दोन्ही पक्ष बाहेर पडून सभा मोडली आणि स्मारकवाल्यांचा हेतू फुकट गेला ! (१५) दिल्लीची राष्ट्रीय सभा डिसेंबर अखेर दिल्ली येथें पंडित मदनमोहन यांच्या अध्यक्षतेखाली तेह- तिसावी राष्ट्रीय सभा भरली व विशेष कोणत्याहि प्रकारची भानगड न होता ती