पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ विलायते स प्रयाण कांच्या नावाचा जयघोष केला. हे पाहून न्या. सर जॉन बुड्रोफ सभेला हजर होते ते मला म्हणाले ' असे स्वागत होण्याकरिता मी आपली सर ही पदवीसुद्धा टाकून देण्याला तयार होईन. ' शेवटी सभेतर्फे मंडळीना उपहार देण्यात आला व दुसरे दिवशी सर्व मंडळी आपापल्या गावी गेली. (१४) विलायतेस प्रयाण अशा रीतीने राष्ट्रीय सभेनेहि सुधारणाविषयी आपली योजना निश्चित केल्यामुळे टिळकाना विलायतेस जाण्याला आता मोकळीक मिळाली. या खेपेला टिळकानी कोणताहि समारंभ कोणास करू दिला नाही. आणि एकदम उठून एखाद्या जवळच्या गावाला गेल्याप्रमाणे ते ता. १९ सप्टेंबर रोजी निघून गेले. त्यांच्या बरोबर वकील म्हणून दादासाहेब करंदीकर स्नेही म्हणून वासुदेवराव जोशी आणि परिचारक म्हणून गणपतराव नामजोशी असे गेले. वॅ. वॅपटिस्टा हे आगा- ऊच विलायतेत असल्यामुळे त्यांच्या उतरण्यावगैरेची व्यवस्था झालेलीच होती. ऑक्टोबर महिन्यात दिल्ली येथील काँग्रेसच्या अध्यक्षाच्या निवडणुकीचे काम सुरू झाले. त्यात अकरा कमिट्याकडून टिळकांची शिफारस करण्यात आल्यावरून स्वागत सभेने त्यांची नेमणूक एकमताने करून त्याना त्याप्रमाणे पोर्टसय्यद येथे तार पाठविली. अर्थात् न खात्या देवालाच हा नैवेद्य म्हणावयाचा ! कारण चिरोल- सकरिता ते विलायतेस गेलेले असून केवळ काँग्रेसचे अध्यक्ष होण्याकरिता दीड- महिन्यात परत येणे अशक्य होते. पण लोकानाहि टिळकांची निवडणूक एकदा तरी केल्याशिवाय समाधान वाटत नव्हते. वास्तविक आदल्या वर्षीच त्यांची या जागेवर निवडणूक व्हावयाची. पण बेझय्बाईना अटक झाली होती व त्याचा निषेध म्हणून त्यांचीच निवडणूक करणे राष्ट्रीयदृष्ट्या इष्ट होते. आणि टिळकानी त्या निवडणुकीला आपण होऊन मदत केली होती. पण निवडणुकीचा प्रसंग यावा आणि तो काही कारणाने न लाभावा अशी गोष्ट टिळकासंबंधाने पूर्वीहि अनेक वेळा घडली होती. म्हणून हा अनुभव कोणाला नवासा वाटला नाही. टिळकानी स्वागत मंडळाला उलट तार करून आभारपूर्वक नकार दिला. पण त्यांच्या या नाकार- लेल्या मानाचा त्याना विलायतेत आपल्या कामी एक प्रकारे उपयोग होण्यासारखा होता. तो असा की प्रत्यक्ष नसले तरी नियोजित अध्यक्ष म्हणून त्याना राष्ट्रीय सभे- तर्फे बोलण्याचालण्याला एक प्रकारची सवड होऊन राहिली. • माँटेग्यूसाहेब येऊन गेले. सुधारणा संवधी त्यांचा रिपोर्ट झाला. राष्ट्रीय सभेने जादा बैठकीत त्यावर आपले मत प्रगट केले, शिष्टमंडळाची आघाडी विलायतेस जाऊन भिडली. आणि मुख्य राष्ट्रीय सभा दिल्लीस लौकरच भरावयाची होती. यामुळे देशात किंचित् स्थिरस्थावर झाले होते. तिकडे विलायतेतहि तहाच्या वाटा- घाटी सुरू असून तेथे काय हालचाली होतात हे समक्ष पाहण्याला व त्या संधीत काय करिता येईल ते करण्याला टिळक ता. ३० ऑक्टोबर रोजी विलायतेस