पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८ लो० टिळकांचे चरित्र भाग ३ कुशलतेने मार्ग काढला. तो असा की मूळ आधार म्हणून माँटेग्यू-चेम्सफर्ड रिपोर्टाचाच घेतला. तथापि स्वराज्याच्या लायखी संबंधाने काँग्रेसने लखनौच्या सभेतील सुरेंद्रनाथ यानी मांडलेल्या ठरावाची प्रस्तावना घेऊन हिंदी राष्ट्र आजहि स्वराज्यास लायख आहे असे विधान केले. इतर बाबीत निरनिराळ्या दुरुस्त्या केल्या. या मुख्य ठरावावर टिळक पाल बैझन्टबाई वगैरेंची भाषणे झाली. रौलेट कमि- टीच्या रिपोर्टाचा निषेध करण्यात आला व शेवटी विलायतेस शिष्टमंडळ पाठ- विण्याकरिता कमिटी नेमण्यात आली. मुंबईस मॉस्लेम लीगची सभा याच सुमा रास झाली तिनेहि अशाच अर्थाचे ठराव केले. अशा रीतीने मुंबईची राष्ट्रीय सभा उलगडल्यावर पुणे सार्वजनिक सभे- मार्फत केळकर यानी कार्याध्यक्ष म्हणून मुंबईस आलेल्या काही प्रमुख गृहस्थाना पुण्यास येण्याबद्दल विनंति केली. त्याप्रमाणे बाबू मोतिलाल घोस चक्रवर्ती चित्त- रंजनदास बिपिनचंद्र पाल बॅ. लहिरी वसंतकुमार घोस चिदंबर पिले कृष्ण- स्वामी शर्मा वगैरे लोक पुण्यास आले. बंगालची ही टिळकांच्या विशेष प्रेमाची मंडळी. व त्यातूनहि मोतिलाल घोस दास पाल वगैरे लोक प्रसिद्ध. यामुळे त्यांच्या भेटीला पुण्यातील अनेक लोक येऊन गेले. आणि ता. ३ व ४ सप्टेंबर रोजी गायकवाड वाड्याच्या पटांगणात त्यांची व्याख्याने झाली. सभाना अध्यक्ष अर्थात् टिळकच होते. पण त्याना भाषणवंदीचा हुकूम असल्यामुळे मूकाध्यक्ष व्हावे लागले ! असा प्रकार अपूर्वं म्हणून लोकाना मोठी मौज वाटली. स्वतः टिळकहि हा प्रकार मोठ्या मौजेने व विनोदाने निभावून नेत होते. कारण बोलून बोलाव- याचे नाही न बोलून बोलावयाचे असा प्रकार त्याना करावा लागत होता. तेव्हा दुय्यम अध्यक्ष म्हणून केळकराना अध्यक्षाचे काम करावे लागले व त्यानीच निरनिराळ्या पाहुण्यांची ओळख करून दिली. पहिले दिवशी चक्रवर्ती च दास यांची भाषणे झाली व पाल हेहि थोडे बोलले, दुसरे दिवशी पुनः सभा भरून कृष्णस्वामी शर्मा महादेव अय्यर चिदंबर पिले वसंतकुमार घोस व फिरून विपिनचंद्र पाल अशी भाषणे झाली. शेवटी बाबू मोतिलाल घोस यांचे भाषण झाले. ते आधीच वृद्ध त्यातून आजारी. केवळ अस्थिपंजर उरलेला. त्यांच्या शब्दानी बोलावयाचे तर ते आज कैक वर्षे मरू घातलेले ! अर्थात् त्यानी मोठे भाषण असे केले नाही. पण महाराष्ट्रीयांचा एवढा मोठा समाज पाहून व गहिंव- रून त्यानी तरुण पिढीला आशिर्वाद दिला आणि असे सांगितले की सार्वजनिक काका न्या. रानडे नामजोशी यांच्यापासून पुणेकरांचा व माझा ऋणानुबंध आहे. व टिळक हे तर माझे धाकटे बंधु असेच मी नेहमी मानीत आलो आहे. सायं- काळी सार्वजनिक सभेत टिळकांच्या मोठ्या तसबिरीचा अनावरण समारंभ झाला. त्यावेळीहि मोतिबावूनी असेच लहानसे भाषण केले. त्या प्रसंगी चक्रवर्ती म्हणाले "टिळकाना पाहून कलकत्याच्या एका सभेची मला आठवण झाली. त्या सभेत टिळक अवचित आल्याबरोबर हजारो लोक एकदम उठून उभे राहिले व त्यानी टिळ-