पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८ लो० टिळकांचे चरित्र भाग १ मला या हुकुमाचे काय सागता ? शिक्षा भोगून आलेल्या लोकाना कोणी भेटू नये असा जेव्हा कायदा होईल तेव्हा पाहता येईल. पण बेळवीसारखे स्पष्ट- वक्ते सर्वच कसे मिळणार ? पण या बाबतीत प्रश्नोत्तरे होण्याचे फारसे प्रसंगच आले नाहीत. धनुष्याची दोरी वाजवूनच जेथे काम भागते तेथे प्रत्यक्ष बाण सोडण्याचे कारण कितीसे पडणार? अर्थात् ज्याना टिळकांच्या भेटीपेक्षा आपल्या उदरनिर्वाहाच्या साधनाची किंमत अधिक वाटण्यासारखी होती ते बिचारे टिळकांच्या भेटीला जातलिच कशाला? आणि ज्याना त्याची तशी किंमत नव्हती त्यानी तर हुकुमाची उघड उघड अवज्ञा केली. सरहद्दीवर असे काही लोक होते की सरकारला म्हटले तर त्यांचे नुक- सान करतां येईल म्हटले तर करता येणार नाही. अशा लोकांपैकी ज्यांची जशी मनो- वृत्ती होती त्यानी तसे आचरण केले. तथापि एकंदरीने हुकुमाची अवज्ञा बरीच झाली आणि कोणाला जर असे वाटत असले की या हुकुमाने टिळकांच्या घरासमोरच्या रस्त्याला स्मशानाचे स्वरूप येईल तर ती मात्र त्यांची कल्पना चुकीची ठरली. फक्त इतकेच झाले की जे कोणी सरदार संस्थानिक सरकारी नोकर टिळकांना न भेटणारे पण नारायण पेठच्या त्या रस्त्यावरून एरव्ही जाणारे त्याना मात्र हा रस्ता काही दिवस बर्ज करावा लागला. कारण त्यावेळी चहाडखोराना हा एक धंदाच होऊन बसला होता. ज्याचे नुकसान करावयाचे तो टिळकाना भेटा- वयाला गेला होता अशी गुप्त बातमी पोलिसाकडे दिली म्हणजे चहाडखोराचे थोडे बहुत काम होई. कारण तो भेटावयाला गेला होता की नाही याची चौकशी करणार कोण व त्याचा पुरावा मिळणार कसा ? टिळकाना कोणी न भेटण्याविषयी सरकारने जाहीरनामा काढलाच होता. परंतु त्याना कोणी प्रत्यक्ष भेटावयास न जाता आपल्याच ठिकाणी बसून सभात मिरवणुकीत त्यांच्या नावाचा जयजयकार करतील व अशा रीतीने त्यांचे वैभव वाढ- वितील ते कसे थांबवावे याचीहि सरकाराला काळजी होतीच. यापैकी त्याना सभा थांबविता आल्या नाहीत. कारण सभाबंदीचा कायदा आता चालू नव्हता. व केवळ अभिनंदनाकरिता सभा झाल्या तर त्याची वर्दी आगाऊ लागून मॅजि- स्ट्रेटचा हुकूम काढून त्या बंद करणे या गोष्टी सोयीच्या नव्हत्या. तथापि आपला हुकूम गाजविण्याला आणि टिळकाविषयीची आपली भावना व्यक्त करण्याला एक मर्मस्थान लवकरच उपस्थित झाले व ते पुण्यातील गणपती उत्सव हे होय. म्हणून पुण्याचे डि. मॅजिस्ट्रेट यानी पोलीस अॅक्टान्वये जाहीरनामा काढला. त्यात पुणे शहर लष्कर व एकंदर पुणे जिल्हा यामध्ये खालील गोष्टी मना केल्या होत्या. १. गणपती देवाचे नावाशिवाय इतर शब्दाचा सार्वजनिक रीतीने मोठ्याने उच्चार करिता कामा नये. व जाहीर ठिकाणी मंजूर केलेल्याशिवाय इतर पद्ये व भाषणे म्हणता कामा नये. २. राजद्रोहाचे गुन्ह्याबद्दल शिक्षा झालेल्या इसमांच्या तसबिरा अथवा चित्रे दाखविता कामा नयेत, व असे इसम अथवा त्यांची 'नातेवाईक' मंडळी