पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ युद्ध परिषदा ५५ पुढील केसरीत टिळकानी लॉर्ड वुइलिंग्डन यांच्या अत्याचारावर स्वतः एक अग्रलेख लिहिला व त्यांच्या भर्तृहरीने नेहमीप्रमाणे योग्य असेच अवतरण याहि वेळी त्याना सुचविले. मय्वप्यास्था न चेत् ते त्वयि मम सुतराम् एष राजन् गतोस्मि । वामन पंडितानीहि असेच लिहिले आहे:- " न गणसि मज जातो तुच्छ मानोनि तूतें " या एका ओळीत टिळकांच्या एकंदर धोरणाचे सार आहे. मध्यप्रांतातहि असाच प्रकार जवळ जवळ झाला. पण तो पत्रव्यवहारावर थांबला. डॉ. मुंजे व मि. स्लोकॉक यांची मुलाखत झाली. त्यासंबंधी एक प्रेसनोट सरकारने काढली. तीत गैरसमज होण्यासारखा काही मजकूर होता. तेव्हा मुंजे यानी आपले सर्व म्हणणे लेखी कळविले. त्यात त्यानी असे दर्शविले की मनोभावाने आमच्याशी वागाल तर सैन्यभरतीला मुळीच पंचाईत पडणार नाही. शिवाय लष्करभरती कशी उत्तम करता येईल याविषयी त्यानी विधायक सूचनाहि पाठविल्या. तेव्हा त्या सर्व मजकुरासह सरकाराला फिरून नवी प्रेसनोट काढावी लागली ! पुढच्या आठवड्यात माँटेग्यू चेम्सफर्ड यांच्या सहीचा सुधारणांच्या योजनेचा सविस्तर मसुदा प्रसिद्ध झाला व सरकार नवे अधिकार काय देणार याची साधा- रण कल्पना आली. त्यावरहि टिळकानी ' उजाडले पण सूर्य कोठे आहे ?' आणि C • जनाब देहली तो बहोत दूर है ' व ' कबूल वा नाकबूल ' असे तीन अग्रलेख लिहिले. त्यांचा निष्कर्ष असा होता की या सुधारणा अपुन्या म्हणून नाकबूल तर केल्याच पाहिजेत. पण त्या नाकबूल करण्याचीहि एक रीती आहे. ती रीत अशी की सर्वस्वी नाकबूली न देता आम्हाला अधिक काय पाहिजे हे सुचवून नाकबुली दिली पाहिजे. निर्भीड व संमिश्र असे दोन दुसरे पक्ष आहेत त्यांचा जादा राष्ट्रीय सभा विचार करील. केसरीचे मत सर्वस्वी नाकबूल असे असले तरी टिळकानी लिहिले की " कॉंग्रेस करील तेच आम्हीहि मान्य करू, मग ती निर्भीडपणे काहीच नको असे म्हणो किंवा संमिश्र पक्षाच्या मताप्रमाणे अधिक काय पाहिजे ते सुचवा. त्यात सार्वजनिक दृष्ट्या काही हानी नाही. कारण काँग्रेससारख्या राष्ट्रीय सभेत सर्व गोष्टी एकाच्याच कलाप्रमाणे होत नसतात. पण काँग्रेसमध्ये काय ठरावे याच्या चर्चेत मदत करण्याला टिळक तोपर्यंत हिंदुस्थानात राहतील की नाही याची शंका उत्पन्न होऊ लागली होती. कारण चिरोल खटल्याकरिता पासपोर्ट मिळविण्याची खटपट टिळकांची सुरू होती. व त्याप्रमाणे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात त्याना 'विलायतेत कोणतीहि राज- कीय चळवळ करावयाची नाही' या अटीवर वकील व एक दोघे सोबती घेऊन जाण्याला सरकाराकडून परवानगी देण्यात आली. या परवानगीचा उपयोग कसा करावयाचा केव्हा करावयाचा याचा विचार टिळक करीत होते इतक्यात ता. ३१