पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६ लो० टिळकांचे चरित्र भाग ३ 1. जुलै रोजी मुंबई सरकारचे सेक्रेटरी यांच्या सहीने एक हुकूम निघाला. त्यात प्रथम टिळकांच्या भाषणातील लष्कर भरतीसंबंधाचे काही उद्गार म्हणून उतारे दिले होते. त्यात पुण्यासता. २२ जून रोजी टिळकानी केलेल्या भाषणाचा एक उतारा होता. तो देऊन 'डिफेन्स ऑफ कन्सॉलिडेशन अॅक्ट प्रमाणे सरकारने असा हुकूम काढला की यापुढे "ज्या जिल्ह्यात तुम्हाला भाषण करावयाचे असेल त्या जिल्ह्याच्या डि. मॅजिस्ट्रेटची व मुंबईस पोलिस कमिशनरची आगाऊ परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला जाहीर भाषण करण्याची मनाई केली आहे." पण याच्या आधीच मुंबई येथे माँटेग्यू-चेम्सफर्ड रिपोर्टाचा विचार करण्याकरिता काँग्रेसची जादा बैठक कर- ण्याचे ठरले होते त्याला उद्देशून हुकुमात इतकी सोडवणूक करून ठेवली होती की " या जादा बैठकीत सुधारणांच्या योजनेसंबंधी ठराव आल्यास त्यावर बोलण्याला मात्र टिळकाना हरकत नाही. " सरकारी हुकुमात ज्या भाषणाचा उल्लेख केला होता त्यात मुख्य मुद्दा इतकाच आहे की लोक सैन्यात जाण्याला तयार होतील पण देशाला त्यापासून काही उप- योग होण्याची आशा असेल तर ! अर्थात् देशात जर नेहमी परतंत्रपणानेच वागावे लागणार तर त्या देशाचे रक्षण केले काय न केले काय ? ही विचारसरणी वैतागाचीच होती हे उघड आहे. कारण इंग्रजी राज्याचे जे फायदे आहेत तितक्या पुरते ते टिळकाना मान्य असल्याचे १९९६ सालच्या ऑगष्टमध्येच त्यानी जाहीर केले होते. पण घासाघीस करून त्यातल्यात्यात काही अधिक अधिकार अधिक लष्करी जागा मिळतात की काय इतकेच टिळकाना पहावयाचे होते. म्हणून या हुकुमानंतर असोसिएटेड प्रेसच्या प्रतिनिधीने टिळकांची मुलाखत घेतली तीत त्यानी आपण खरोखर काय बोललो हे काढून दाखविले. आणि मुंबईच्या सभेत जाहीर केल्याप्रमाणे लष्कर भरतीच्या जामीनकीबद्दल पन्नास हजार रुपयांच्या ठेवीच्या पावत्या त्यानी गांधीकडे पाठविल्या होत्या ते पत्र व गांधींचे उत्तर हीहि त्या प्रतिनिधीला दाखविली. या पत्रात त्यानी आपली अट स्पष्ट लिहिली आहे. " हिंदुस्थानातून जे रिक्रूट सैन्यात दाखल करण्यात येतील त्याना लष्करी कॉलेजात शिक्षण घेण्यास परीक्षा देण्यास व अधिकाराच्या जागा मिळ- ण्यास युरोपियनांच्या जोडीनेच समान संधी मिळावी आणि वरिष्ठ जागा व कमि- शने उघड चढाओढीने मिळण्याचा मार्ग खुला व्हावा. ". या अटीत काही विशेष वावगे होते असे कोणीहि म्हणणार नाही. कारण या दृष्टीनेच नेमस्त सुधारणावादीहि आजपर्यंत प्रयत्न करीत आले आहेत. पण या भाषणबंदीमुळे तरी सरकारला रिकूट भरतीत काय फायदा झाला? कारण पुढे लवकरच गांधीनी टाइम्स ऑफ इंडियाला पत्र लिहिले त्यात ते म्हण- तात " मुंबई सरकारने टिळकांच्या व्याख्यानाला बंदी केली यामुळे माझ्या रिक्रू- टींगच्या कामाला हरकत येत आहे यास्तव ती सरकारने दूर करावी ! "