पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४ लो० टिळकांचे चरित्र भाग ३ इतके बोलताच लॉर्ड बुइलिंग्डन उठून म्हणाले की मी या भाषणात राजकीय चर्चा करू देणार नाही. केळकर म्हणाले माझे भाषण आणखी थोडे ऐका व मग निर्णय करा. परंतु मला तसे करता येत नाही असे गव्हर्नरसाहेबानी सांगताच केळकर हेहि उटून गेले व त्यांच्या मागोमाग हॉर्निमन जमनादास बमनजी हे हि उठून गेले. नंतर इतर वक्त्यांची भाषणे झाली. त्यात बॅ. जिना यानी वकिली पद्धतीने बोलता बोलता होमरूलर लोकांचे म्हणणे मधून मधून घुसडून दिले. त्यावर अध्यक्ष म्हणाले जी गोष्ट माझ्या हातची नाही ती येथे बोलून काय उप- योग ? तेव्हा जिना म्हणाले हा तोंड बांधून बुक्कयांचा मार आहे. नंतर दादासाहेब करंदीकर यांचे भाषण झाले. ते म्हणाले मीहि होमरूलर आहे आणि मीहि असेच सांगतो की स्वराज्य दिल्याखेरीज युद्धाकरिता मनुष्यबळ द्रव्यवळ यांची लोकाकडून हौसेने मदत मिळणार नाही. सर्व भाषणे संपल्यावर गव्हर्नरसाहेब म्हणाले " या कार्याला एकदिलाने मदत होईल अशी मला आशा होती ती सफल झाली नाही. होमरूलर लोकांच्या राजनिष्ठेविषयी मी संशय घेत नाही" तेव्हा जिना मध्येच म्हणाले ' तुमचे भाषण काढून पाहा म्हणजे कळेल. ' तेव्हा जिना याना कारमायकेल साहेबानी व इतरानी बसा बसा म्हणून गोंगाट केला. शेवटी गव्हर्नरसाहेबानी आपले भाषण कसे तरी संपविले. नंतर दुसरे दिवशी टिळक जमनादास बसनजी हॉर्निमन व केळकर यानी आपण सभेतून उठून का आलो याचा खुलासा प्रसिद्ध केला. तसेच हॉर्निमन जमनादास वगैरे काही लोकानी या- पुढे लॉर्ड विलिंग्डन अध्यक्ष असतील अशा सभेला आम्ही हजर राहणार नाही असे जाहीर केले. आणि त्यानी व इतर काही लोकानी युद्धास मदत करणाऱ्या कमिट्यातून आपली नावे काढून घेतली. ता. १६ रोजी मुंबईस स्वराज्यदिनोत्सव करण्यात आला. त्या निमित्ताने शांतारामाच्या चाळीत मोठी सभा भरविण्यात आली. गांधी हे अध्यक्ष होते. ते म्हणाले "लॉर्ड वुइलिंग्डन यांच्या वर्तनाचा मी निषेध करतो. केळकर याना पूर्वी आश्वासन मिळाल्याप्रमाणेच टिळक वगैरे गृहस्थ सभेला जाऊन भाषणे करणार होते. तेव्हा त्याना मध्येच प्रतिबंध कर- ण्यात आला ही गोष्ट अश्लाघ्य व अनुदार आहे. टिळकांचा असा उपमर्द केल्याने साम्राज्याच्या कार्याला अपायच आहे. " जिना हेहि म्हणाले की "लोकांची मदत घ्यावी अशी सरकारची खरी इच्छा आहे कोठे ? टिळकानी लष्कर भरतीचे पुष्कळ प्रयत्न केले पण ते अशा कारणानीच फसले." टिळक म्हणाले “सरकार आम्हाला अप्रामाणिक म्हणते पण त्यांच्या अप्रामाणिकपणाबद्दल मजजवळहि पुष्कळ पुरावा आहे. देशावरील बंधने अधिक वाढवून घेण्याकरिता सरकारास कोण मदत करील ? लष्करात वरिष्ठ जागा देण्याचे सरकार कबूल करील तर मी पांच हजार लोकांची भरती करीन. व तसे मजकडून न होईल तर कमी पडतील त्या माणसागणिक मी शंभर रुपये दंड देईन. आणि याची जामिनकी म्हणून मी गांधींच्याजवळ पन्नास हजार रुपये ठेवण्याला तयार आहे. "