पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ युद्धपरिषद ५३ दिल्ली वॉरकान्फरन्सचे कार्य पुढे ढकलण्याकरिता ता. १० जून रोजी मुंबईस टाऊन हॉलमध्ये सभा भरली होती. सभेला ठराविक गण आले होते. ठराविक पोटमंडळे नेमली गेली. आणि ठराविक भाषणे झाली. निरनिराळ्या संस्थानिकाना आपली कर्तबगारी दाखविण्याला अर्थात् ही योग्य संधी होती. आणि कोल्हापुर संस्थानात सर्वाहून अधिक चांगले काम झाले असा उल्लेख करण्यात आला ! दिल्ली परिषदेला टिळकाना निमंत्रण नव्हते ही चूक लॉर्ड वुइलिंगडन यानी दुरुस्त केली आणि व इतर काही स्वराज्यवादी लोक याना निमंत्रणे झाली. पण दिल्लीसारखाच येथेहि प्रकार घडला. दिल्लीस खांपड्यांचा ठराव पुढेच येऊ दिला नाही हे पाहून टिळक वगैरे मंडळीनी 'आम्हास भाषणे करावयाची आहेत' असे लिहून आगाऊच कळविले होते. टिळकांच्या सांगण्यावरून केळकर यानी लॉर्ड वुइलिंग्डन यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीशी पत्रव्यवहार केला होता. ता. ३० मेच्या पत्रात केळकरानी लिहिले होते की "सभेचा कार्यक्रम पाठवा. ठरीव बक्त्याखेरीज इतर कोणास बोलण्याची परवानगी आहे की नाही आणि दिल्ली परिषदेत झालेल्या ठरावाना कोणी उपसूचना आणली तर आणण्याची परवानगी देणार की नाही ?" त्याला प्रायव्हेट सेक्रेटरी मि. क्रेरर यानी उत्तर पाठवून कळविले की "कार्यक्रम तयार झाल्यावर पाठवू आणि ठराविक भाषणे झाल्यावर जाहीर चर्चेत कोणाला बोला- वयाचे असल्यास परवानगी देऊ. ठराव काय होणार हे आम्ही ठरवू. उपसूचना आणण्याला परवानगी देण्यात येणार नाही. तथापि चर्चेमध्ये जी भाषणे होतील त्यांचा सरकार योग्य तो विचार करील. कळल्यामुळे टिळकानी उपसूचना पाठविल्या नाहीत. पण तोच विषय भाषणात आणण्याचे त्यानी व इतर कित्येकानी आधी ठरवून ठेवले. जाहीर चर्चा सुरू झाल्यावर टिळकाना भाषण करण्यास बोलावले. ते म्हणाले की "उपसूचना आणण्यास परवानगी नाही म्हणून मी ती आणली नाही. तथापि लोकांचे म्हणणे काय आहे हे आम्ही सांगतो. प्रथम आम्ही असे सांगतो की हिंदुस्थानावर आज नाही उद्या स्वारी झाली तर आम्ही हिंदी लोक प्रतिकारार्थ आपले देहहि खर्ची घालू. पण स्वराज्य व स्वदेशसंर- क्षण यांची साखळी आम्हाला तोडता येत नाही." हे वाक्य उच्चारताच गव्हर्नर साहेबानी टिळकांचे भाषण थांबविले व म्हणाले की या सभेत राजकारणाची चर्चा मी करू देणार नाही. त्यावर टिळक म्हणाले "अशा परिस्थितीत परिषद सोडून जाण्याशिवाय कोणाहि स्वाभिमानी मनुष्याला दुसरा मार्ग नाही! म्हणून मी निघून जातो" असे म्हणून ते उठून गेले. यानंतर केळकराना बोलण्याविषयी निमंत्रण केले. ते म्हणाले " आमच्या राजनिष्ठेविषयी सरकारास शंका असण्याचे कारण नाही. हिंदुस्थानात मनुष्यबळ कसे जमवावे याविषयी माझ्या काही सूचना आहेत त्या मी पुढे करीनच. पण आम्ही लोकाना सैन्यात शिरण्याचा उपदेश करावयास निघालो तर आम्हास त्याना असे दाखविता आले पाहिजे की सरकार तुमचा राजकीय दर्जा वाढविण्यासाठी मनापासून प्रयत्न करीत आहे."