पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२ लो० टिळकांचे चरित्र | मदत न केली तर ती चोपून घेण्याची सत्ता अधिकाऱ्यात रहाणारच. पण ब्यूरॉक्रसीने पाठीमागून स्वराज्य दिले नाही तर आम्ही काय करणार ? आजपर्यंत वचनभंग होत गेल्याने स्वराज्यवाद्यांची ही शंका स्वाभाविक आहे. साम्राज्यास मदत केली तरी स्वराज्य देणार नाही. 'स्वराज्य दिले तरी मदत करणार नाही अशा स्वराज्यवाद्यांचा चवथ्या वर्गात समावेश करावयाचा. परंतु असले 'सिनफेनरी' हिंदुस्थानात आस्तित्वात नाहीतच. परंतु ब्यूरोक्रॅटात मात्र ' काही झाले तरी स्वराज्य देऊच नये' असे म्हणणारे सिडनहॅमी कंपूचे अनुयायी किती तरी आहेत. बाह्यतः बोलताना ते केव्हा तरी कसे तरी स्वराज्य देऊ असे सांगतात. परंतु पांचशे वर्षानी स्वराज्य देतो म्हणणे हे कधीच स्वराज्य देत नाही म्हणण्यासारखेच आहे. स्वराज्य दिले तरी मदत करणार नाही. भाग ३