पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ युद्धपरिषदा स्वराज्यवादी स्वराज्य मिळविण्याचा सरळ मार्ग म्हणून आम्ही साम्राज्यास बिनशर्त मदत करणार. स्वराज्यवादी व ब्युरोक्रॅटस् यांच्या गुणदोषांची तुलना ब्यूरोक्रॅटस् स्वातंत्र्याचे भोक्ते व चहाते म्हणून बिनशर्त स्वराज्य देणार. साम्राज्याला बिनशर्त मदत स्वराज्य देण्याची आमची करण्याची आमची इच्छा आहे । इच्छा आहे पण साम्राज्यांतर्गत पण आमच्यात शक्ती व उत्साह स्वराज्य देण्याला साम्राज्य तर उत्पन्न होण्याला आम्हाला आधी टिकले पाहिजे ना? यास्तव आधी स्वराज्य द्या म्हणजे त्या योगाने मदत करा मग स्वराज्य देऊ साम्राज्याचे रक्षण वेळीच होईल. स्वराज्य द्या म्हणजे आम्ही मदत करू. मदत करा म्हणजे मग स्वराज्य देऊ. शेरा बिनशर्त मदत करणारे म. गांधीसारखे स्वराज्यवादी आपल्यात आहेत पण बिनशर्त स्वराज्य देतो म्हणणारा एकहि व्युरोक्रॅट अस्तित्वात असेल असे वाटत नाही. या वर्गात स्वराज्यवादी व व्युरोक्रॅटस् वा उभयतांची इच्छा व मागणी प्रामाणिक असली तरी मदत करण्यापूर्वी स्वराज्य देणे जसे जरूरच आहे तसे काही स्वराज्य देण्यापूर्वीच मदत करणे अपरिहार्य नाही. आज ब्रिटिश साम्राज्य स्वराज्य देऊ शकेल कारण ते त्यांच्या स्वाधीनचे आहे. पण मदत करण्याचे औत्सुक्य स्वराज्याविना उत्पन्न करणे स्वराज्यवाद्याना अशक्य आहे. सारांश स्वराज्यवादी आपला मार्ग सुलभ होण्याकरिता प्रथम स्वराज्य मागतात. पण ब्युरोक्रॅटाना ते प्रथम न देण्याला स्वार्थाशिवाय काहीच सचव नाही. या वर्गातले स्वराज्यवादी व ब्यूरोक्रॅट्स दोघेहि अट घालणारे आहेत. परंतु या उभयतात अधिक दोषास्पद कोण ते पाहू. पहिली गोष्ट ही की बऱ्याच स्वराज्यवाद्यांचा भरणा पहिल्या व दुसऱ्या वर्गातच असून तिसऱ्या वर्गात बाकीचे स्वराज्यवादी येतात. परंतु ब्यूरोक्रॅटांचा बहुतेक भरणा या वर्गातच येईल. शिवाय मुख्य भेद हा आहे की स्वराज्य दिल्यानंतर आम्ही