पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० लो० टिळकांचे चरित्र भाग ३ व्यर्थ होय. असे म्हणून ते उठून गेले. पण यानंतर त्यांची व व्हाईसरायसाहेबांची बराच वेळ मुलाखत झाली. त्यानंतर गांधी फिरून कमिटीला येऊन बसले. शिपा- यांचे पगार लष्करी जागा यासंबंधी चर्चा झाल्यावर कोणी स्वराज्याचा ठराव पुढे आणला. तेव्हा तो या कमिटीच्या कार्यात येऊ शकत नाही म्हणून फेटाळ- ण्यात आला. यानंतर 'फिरून कॉन्फरन्समध्ये मी तो ठराव आणणार' अशी खापर्डे यानी नोटीस दिली. पण त्यालाहि अर्धचंद्र देण्यात आला. यानंतर सरकारला हवे ते बाकीचे ठराव मंजूर झाले. पण त्यांची अंमलबजावणी होण्याला लोकपक्षाकडून कितपत मदत होणार होती हे दिसतच होते ! टिळक लष्करभरतीविरुद्ध बोलतात हा जसा त्यांच्यावर आरोप तसाच बाई व रामस्वामी अय्यर याना जर्मनीने पैसे चारले आहेत असा एक उडता आरोप आणण्यात आला होता. विशेषतः ही गप्प अमेरिकेत उघडपणे उठविली गेली होती. म्हणून बाईनी सर सुब्रह्मण्यम् अय्यर याजकडून प्रे. विल्सन यांचे नावे एक पत्र लिहविले. त्यात हिंदुस्थानात लष्करभरती न होण्याची खरी कारणे लिहिली होती. या पत्राचा परिणाम अमेरिकेत चांगला झाला. हे पत्र ता. २४ जून १९१७ रोजी लिहिले होते. त्याची अमेरिकेत बरीच चचा झाली. बाईंचे एक थिऑसॉफिकल स्नेही हॉचनर म्हणून अमेरिकेत होते त्यानी थेट प्रे. विल्सन यांची गाठ घेतली व त्यामुळे प्रकरण नेटाला लागले. आणि रूझवेल्ट ब्रायन वगैरे लोकानी लक्ष घातल्यामुळे कर्नल हौस हे विलायतेस गेले व त्यानी बाईची सुटका करविली असे सांगतात ! ता. ३ मे रोजी मुंबईस ऑ. इं. काँ. कमिटीची सभा भरली होती. तीत काही पुढाऱ्याना दिल्लीस निमंत्रण केले नव्हते याचा निषेध करून खापर्डे यानी व्हाईसरॉयसाहेबाकडे पाठविलेल्या स्वराज्यविषयक ठरावाला संमति देण्यात आली. तसेच विलायतेहून बॅपटिस्टा यानी सुचविल्याप्रमाणे पुढील राष्ट्रीय सभेला मजूर- पक्षाच्या प्रतिनिधीना आमंत्रण द्यावे असे ठरले. या सभेला गांधी हजर होते. या सुमारास म्हणजे ता. २३ मे च्या मुंबई टाइम्समध्ये एका गृहस्थाने गीतेतील श्लोक देऊन असे म्हटले की "गीतेत युद्धाला प्रवृत्त करण्याचा उपदेश आहे. पण स्वराज्यवादी आधी करार करून शर्ती ठरवून मग सैन्यात जाणार !” ही कोटी बाष्कळ होती. तिला केसरीत एका 'गीतापाठी' गृहस्थाने खरपूस उत्तर दिले. तो म्हणतो:- कृष्णाने अर्जुनाला युद्धाला उभा करण्यापूर्वी स्वर्ग किंवा पृथ्वी या दोहोंपैकी एक तरी निश्चित दिले होते. मेलास तर स्वर्ग मिळेल आणि युद्ध जिंक- लेस तर पृथ्वीचे राज्य मिळेल असे सांगितले होते. पण इंग्रज आम्हाला आज असे म्हणत आहेत की 'तूं मेलास तर तुला स्वर्गप्राप्ती होईल. आणि हे युद्ध जिंकले तर आम्हीच पृथ्वीचे राज्य करू.' या बाबतीत स्वराज्यवादी व अधिकारीवर्ग यांची तुलना करून गीतापाठी याने जे कोष्टक दिले ते फार मार्मिक असल्यामुळे आम्ही ते येथे देतो.