पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ युद्धपरिषदा ४९ गुड होप वरून जपानी बोटीने कोणी जाण्यास तयार असल्यास कळवावे. पण बॅ. बॅपटिस्टा यांच्या पंचांगातहि टिळकाना निघण्याला अजून मुहूर्त सापडत नव्हता. (१२) युद्धपरिषदा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हिंदुस्थानसरकारने दोन खलिते प्रसिद्ध केले. पहिल्यात टिळक व इतर शिष्टमंडळे यांचे पासपोर्ट रद्द का केले याचे सम- र्थन होते. पण ते लंगडे लुले असेच होते. युद्ध निकराला आले असून ही वेळ विलायतेत होमरूलची चर्चा करण्याला अनिष्ट आहे म्हणून यावेळी शिष्टमंडळाला जाऊ देत नाही असा रोख होता. पण याच वेळी विलायतेत आयरिश होमरूलची खटपट आतून बाहेरून सुरू होती ही गोष्ट विचाऱ्या हिंदी लोकाना काय माहीत ? नव्या पार्लमेंटात सक्तीच्या लष्कर भरतीच्या बिलावर वाद चालू असता डिलन यानी हा प्रश्न उप- स्थित केला होता. व त्याला लॉईड जॉर्ज यानी उत्तर दिले होते की " आयल- न्डला आधी होमरूल देऊ व मगच हा कायदा त्याला लावू. सरकारच्या दुसऱ्या खलित्यात दिल्ली येथे वॉरकॉन्फरन्स भरविण्यात येईल असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे ता. २७ रोजी दिल्ली येथे ही परिषद भरविण्यात आली. प्रत्येक प्रांता- तून प्रतिनिधी प्रांतिक सरकारच्या विद्यमाने बोलावण्यात आले होते. पण टिळ- काना या सभेला आमंत्रण नव्हते. प्रथम व्हाईसरॉय यानी बादशहाकडून आलेला संदेश वाचून दाखविला. नंतर मनुष्यबळाची व युद्धसाधनांची तरतूद करण्या- करिता अशा दोन कमिट्या नेमण्यात आल्या. या परिषदेच्याच दिवशी पुण्यास किर्लोस्कर नाटक गृहात फार मोठ्या प्रमाणावर नागरिकांची जाहीर सभा भरविण्यात आली. ह. ना. आपटे अध्यक्ष होते. त्यानी सांगितले की आम्हाला या परिषदेला प्रतिनिधी निवडून पाठविण्यास सांगितले असते तर आम्ही टिळकानाच पाठविले असते ! मुख्य ठरावात असे लिहिले होते की हिंदु- स्थानाला राज्याधिकार देण्याला सुरवात करा म्हणजे आमची सहकारिता ठेविलेलीच आहे. महाराष्ट्राच्या लोकापुरते बोलावयाचे तर त्यानी नादिरशहाच्या वेळी सरहद्दीचे रक्षण दिल्लीच्या बादशहाकरिता केले होते. मग तसले काही कार्य ते आजहि कर- णार नाहीत काय ? पण स्वराज्याची गीता सांगितल्याशिवाय लोकाना स्फूर्ती कशी येणार? अशा अर्थाचे वेगळ्या शब्दानी लिहिलेले एक पत्र टिळक बेझन्टबाई जिना पटेल वगैरे लोकानी सह्या केलेले याच वेळी प्रसिद्ध करण्यात आले होते. दिल्लीच्या वॉर कॉन्फरन्समध्ये युद्धास मदत करण्याबरोबर उलट बाजूच्या सहका- रितेचा प्रश्न निघाला. तेव्हा व्हाईसरायसाहेबानी एकदमच सांगून टाकले की ज्यांचे म्हणणे ऐकून घ्यावयाचे होते त्यांचे पूर्वीच ऐकून घेतले आहे व त्याचे उत्तर योग्य वेळी लोकाना मिळेलच. वॉर कान्फरन्सच्या कमिटीमध्ये गांधी होते. त्यानी सांगितले की टिळक बेझन्टबाई अल्लीबंधू अशा लोकाना तुम्ही येथे बोला- बले नाहीत तर तुम्हाला देशात मनुष्यबळ कसे कोण देणार ? अर्थात ही चर्चा