पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ लो० टिळकांचे चरित्र भाग ३ तारेची वाट पाहिली. पण तार आली नाही ! रात्री बोट ठरल्याप्रमाणे बंदरांतून निघून गेली. आम्ही मात्र हताश होऊन घरी परत आलो. “आज व्हाइसरॉयसाहेबाकडे टिळकानी सविस्तर हकीकतीची आणखी एक तार पाठविली असून "शर्त घालूनहि का होईना पण वाटेल त्या बोटीची व वाटेल त्या मार्गाने जाण्याची सर्वसाधारण अशी परवानगी द्या" अशी तारेत विनंति केलेली आहे. झालेली सर्व हकीकत वर्तमानपत्राकडे त्रोटक रीतीने तारेने कळविली आहेच. पण सेनसॉर कोणती तार पाठवितात कोणती अडकवून ठेवतात कोणी सांगावे ? याकरिता ही कच्ची हकीकत केसरीतून प्रसिद्ध होऊन सर्व मित्रमंडळीस कळावी याकरिता पाठवीत आहे. पुढे हकीकत घडेल तीहि अशीच कळवीन. " टिळकांचे पासपोर्ट रद्द केल्याची बातमी मुंबईस कळताच मुंबईकरानी ताब- डतोब जिना यांचे अध्यक्षतेखाली निषेधप्रदर्शक सभा भरविली. तसेच सर्व हिंदु- स्थानभर वर्तमानपत्रानी या बंदीचा निषेध केला. विलायतेतहि निषेधाची चळवळ झाली. ता. १३ एप्रिल रोजी इंग्लंडातील होमरूल लीगने निषेधपर ठराव करून तो मि. लॅन्सवरी यांच्या सहीने मजूरपक्षाच्या सगळ्या शाखाकडे पाठविला. व त्याबरोबर असेहि कळविले की नॉटिंगहॅम येथे मजूरपक्षाने हिंदी होमरूलचे समर्थन करण्याचा ठराव केला आहे त्याचा चोहोकडे फैलाव करून मदत द्यावी. पार्लमेंटमध्ये याबद्दल प्रश्नोत्तरे झाली. एकट्या टिळकांचाच हा प्रश्न नव्हता. कारण मिसेस नायडू याना असाच प्रतिबंध झाला. जॉर्ज जोसेफ याना जिब्राल्टरला उतरून घेतले व पुढे जाऊ दिले नाही असे बरेच प्रकार एकदम झाले. पण बॅपटिस्टा याना ही गोष्ट बऱ्याचीच झाली असे वाटले. कारण त्यांच्यामते हल्लीची वेळ विलायतेत जाऊन हिंदी लोकानी आपले म्हणणे मांडण्याला फारशी अनुकूल नव्हती. त्यानी जमल्यास निघणे थांबवा अशी तार करण्याचा विचारहि केला होता. पण इतर मंडळी न आली तरी टिळकानी एकट्यानी यावे असे लॅन्सबरी वगैरेंचे म्हणणे होते. हॉर्निमन यानी अशी कोटी केली होती की जॉन दि बॅपटिस्ट याच्या मागून ख्राइस्ट अवतरला तसे जोसेफ बॅपटिस्टाच्या मागोमाग टिळक इंग्लंडात अवतीर्ण होणारच. ता. २९ एप्रिल १९१८ रोजी मि. अॅप- टिस्टा यानी एक जंगी खलिता पुण्यास पाठविला. त्यात त्याना विलायतेतील परिस्थिती जशी दिसली तशी खुलासेवार लिहिली आहे. तसेच ता. १२ जूनच्या पत्रात ते लिहितात. " खाली लिहिलेल्या चार गोष्टी झाल्याच पाहिजेत. १ टिळक हे काँग्रेसचे अध्यक्ष निवडले गेले पाहिजेत. २ क्रि० मजूरपक्षाच्या सारखा हिंदुस्थानात एक मजूरपक्ष स्थापला पाहिजे, ३ विलायतेतील मजूर पक्षाला निवडणुकीच्या प्रसंगी पैशाची काही मदत केली पाहिजे. ४ ब्रि. काँ. कमिटी व इंडिया पत्र हे काँग्रेसचे मुख बनविले पाहिजे. " पण टॉमस कुक कंपनीकडे शोध करता असे कळले की नोव्हेंबरपर्यंत टपा- लच्या बोटीत एकट्या टिळकानाहि जागा मिळणार नाही. कोलंबोहून केप ऑफ