पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ सुटके नंतरची नजर कैद वावी. तात्पर्य अमुक व्यक्ति टिळकाना भेटावयाला गेली किवा न गेली याची नक्की माहिती मिळण्यापेक्षा आपली 'इभ्रत राखण्याकरिता च लोकाना दरारा बसविण्याकरिताच हा हुकूम काढला होता. या हुकुमात अर्थात् बेकायदेशीर असे काहीच नव्हते. पण त्याने सरकारच्या मनाचा हलकेपणा मात्र प्रगट झाला. हे धोरण टिळकांच्याच बाबतीत सरकारने ठेवले होते असे नाही. तुरुंगांतून सुटून आलेल्या ठळकशाच काय पण किरकोळ अशा राजकीय गुन्हेगारावर सरकार नजर ठेवीत असे. त्या १०/१५ वर्षांत पोलिसांना हे एक नवेच काम झाले होते आणि हे काम वाढले म्हणून प्रगट व गुप्त पोलिसखाते बरेच फुगले होते. वास्तविक तुरुंगातून सुटून आल्यावर सरकारने कोणाला उपद्रव का द्यावा ? एरवी कैदी सुटून आल्यावर किंबहुना ते सुटण्यापूर्वीहि त्यांची उपजीविका पुढे चालावी याकरिता सरकार काही उपाय योजीत असते. पण नैतिक गुन्हे करणारावर सरकारची माया आणि राजकीय गुन्हे करणाराशी मात्र त्यांचा द्वेष अशी विपरीत वृत्ती त्यानी स्वीकारली होती. त्यात दिलदारीचा मागमूसहि नव्हता. चळवळीत पडलेल्या लोकांचे उद्योगधंदे तुरुंगात गेल्याने बंद तर पडतच. पण ते सुटून आल्यावरहि कांहीच्या मागे असा ससेमिरा लागे को सरकारची अवकृपा होईल म्हणून त्याना कोणी थारा देऊ नये. यामुळे अशा लोकांच्या अंगी असलेली विद्याकलाही फुकट होऊन अनेक लोक अन्नालाहि महाग झाले. या छळाचे नैतिक समर्थन कसे होणार ? कोणाला कोठे नोकरी मिळालीच तर पोलिसानी नोकरी देणाराच्या मागे लागावे, आणि त्याला आज ही तर उद्या ती आणि परवा तिसरीच अशी नोकरी पाहण्याचे प्रसंग यावेत. आकाशातील ग्रहणाचा वेध ग्रहणाच्या फक्त आधीच काही वेळ लागतो आणि मोक्षकाळी स्नान केल्यावर ग्रहणदोपाची बाधा रहात नाही. पण सरकारी ग्रहणाचा वेध खटल्याच्या आधी लागे. पुढे ज्यावर खटला होणार त्यावर पोलिसाच्या काळ्या डगल्याची छाया बरीच आधी पडे तशीच ती तुरुंगातून सुटून येऊन गुन्ह्याचे पापक्षालन केल्यावरहि बराच काळ टिकत असे. टिळकाना भेटण्यासंबंधाचे हे हुकूम पुण्यालाच नव्हे तर सर्व इला- ख्याला लागू होते. आणि ते पाळण्यांत जिल्हा कलेक्टरच्या दर्जाच्याहि लोकानी ठिकठिकाणी बराच मूर्खपणा प्रगट केला. आपण या बाबतीत कोणाला हटकतो याचेहि त्याना भान राहिले नाही. बेळगावचे वकील दत्तोपंत वेळवी अशी गोष्ट सागतात की ते रीतीप्रमाणे टिळकाना येऊन भेटून गेल्यावर त्याना बेळगाव कलेक्टरानी बोलावणे पाठवून दिमाखाने विचारले की कायहो तुम्ही टिळकाना भेटावयाला गेला होता म्हणे ? त्यावर बेळवी म्हणाले होय गेलो होतो. कलेक्टर म्हणाले सरकारी वटहुकूम तुम्हाला माहीत नाही काय ? त्यावर बेळवी यानी तित- क्याच दिमाखाने उत्तर दिले की मी कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही काय ? मी एक स्वतंत्र वकील आहे व टिळकाना भेटण्याकरिता हायकोर्ट माझी सनद काढून घेईल असे मला वाटत नाही. शिवाय मी कायदे कौन्सिलचा सभासद आहे.