पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ कोलंबोची सफर ४७ आम्हास बोटीवर जाण्याची परवानगी द्या. वाटेल तो करारनामा व्हाइसरॉयसाहे- बांच्या तारेप्रमाणे आम्ही तुम्हास लिहून देतो " असे कलोनिअल सेक्रेटरीस मी समजावून सांगितले. ते त्यास पटलैहि. ते म्हणाले -" यापुढे तार जाऊन व्हाइस - रॉयसाहेबाकडून आणखी तीन चार तासात उत्तर येणे शक्य नाही. म्हणून मीच आमच्या गव्हर्नरसाहेबांच्या कानावर हा मजकूर टेलिफोनने घालतो व तुम्हास परवानगी देता आली तर पहातो. " या आश्वासनाने आम्हास खरोखर फिरून आशा उत्पन्न झाली. कारण कलोनिअल सेक्रेटरीकडे तीन-चार वेळा जाण्याचा प्रसंग आला व त्या त्या वेळी ते आमच्याशी सभ्यपणाने व भलेपणाने वागले होते. सुमारे तीन वाजता त्यांचे उत्तर मिळणार होते ! " झालेली हकीकत टिळकाना सांगण्याकरिता आम्ही परत घरी आलो तो इकडे व्हाइसरॉयसाहेबाकडून टिळकाना पहिल्या तारेला उत्तरादाखल तार येऊन राहिली होती. या तारेत शर्तीच्या परवानगीचाच मजकूर होता व ' केपपर्यंत ' असे शब्दहि होते. जास्त शब्द होते ते मात्र असे की हल्ली विलायत सरकारने डेप्युटेशनला बंदी केली त्याचे कारण बहुधा हेच असावे की ' विलायतेत विचार व उद्योग जो कोणताहि व्हावयाचा तो फक्त युद्ध जोराने कसे चालू ठेवावे यापुरताच होणे इष्ट आहे. तथापि तुमचे प्रकरण मी विलायत सरकाराकडे विचाराकरिता पाठवीत आहे. " "ही तार घेऊन आम्ही फिरून तीन वाजता सेक्रेटरीसाहेबाकडे गेलो. तो सेक्रेटरी साहेबानी सांगितले की “टेलिफोन करून गव्हर्नरसाहेबास विचारले. पण ' केपपर्यंत' असे शब्द आहेत त्या अर्थी इतर मार्गाने आम्हास परवानगी देता येत नाही ! मात्र आपली तार व्हाइसरॉयसाहेबाकडे पाठविण्याची मी कालच्या- सारखी सवलत देतो अशा रीतीने सर्व उपाय खुंटल्याने व्हाइसरॉयसाहेबास आणखी एक तार रवाना करून आम्ही निराश होऊन घरी परत आलो. ८८ 33 या वेळी ४|| - ५ वाजले होते. 'लॅकेशायर ' बोट बंदरात उभी असून बरोबर सात वाजता सुटणार होती. पुढील तास दीड तासात उत्तर येणार कसे ? आले तरी पासपोर्टवर लेखी मंजुरी लिहिली जावयाची कशी ? आमची उत्कंठा व निराशा पाहून सेक्रेटरीनी रा. करंदीकर यांस सहानुभूतिपूर्वक असे सांगितले की तुम्हा मंडळीखातर मी आज पाचाचे ऐवजी सहा वाजेपर्यंत हपिसात रहातो व उत्तर अनुकूल आल्यास एका क्षणात मंजुरी लिहून देऊन मोकळे करतो. बरे, हे झाले तरी आमची सर्व मंडळी व सामान पडले दोन मैलावर. ते आयत्या वेळी बोटीवर कसे चढणार ? याकरिता पन्नास रुपये खर्चून आम्ही थॉमस कुक कंपनीकडून एका स्पेशल लाँच ( पडाव ) वर धक्क्यावरील आमचे इतर सामान चढवून खलाशी तयार राहण्याची व्यवस्थाहि करविली. व अगदी अखेरपर्यंत टि० उ...१६