पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६ लो० टिळकांचे चरित्र भाग ३ "वरील प्रकारची माहिती घेऊन रा. गोखले हे घरी आले तेव्हा सर्व मंड- ळीच्या आशेस फिरून थोडी धुगधुगी आली. केपपर्यंत जाऊ देतात तर तेथपर्यंत तरी जाऊ मग पुढे काय होईल ते पाहता येईल असे सर्वानुमते टिळकानी ठर- विले व केपपर्यंत जाण्याच्या परवानगीसंबंधाची मंजुरी फिरून सर्व पासपोर्टवर मांडून घेण्याकरिता रा. करंदीकर भी व गोखले कलोनियल सेक्रेटरीकडे गेलो. पासपोर्टवर के पपर्यंत जाण्याची मंजुरी तर लिहून द्याच पण शिवाय व्हाइसरॉय - साहेबास आणखी एक तार आम्ही करीत आहो तीहि कालच्यासारखी तुम्ही आजहि 'सेन्सॉर' कडून पुढे जाऊ द्या असे मी त्यास सांगितले. येथे हे सांगणे जरूर आहे की व्हाइसरॉयसाहेबानी शर्तीची परवानगी दिली असे सकृद्दर्शनी दिसले खरे. पण त्यात केपपर्यंत जाण्याची परवानगी द्या असे शब्द वास्तविक विनाकारण पडले होते व त्या शब्दामुळेच ती शर्तीची परवानगीहि फुकट गेली. टिळकानी व्हाइसरॉयसाहेबास केलेल्या तारेत केपचा उल्लेख मुळीच नव्हता. पण इतर रिपोर्ट सरकाराकडे पूर्वी गेले त्यात व वर्तमानपत्रातूनहि आम्ही केप-मार्गाने जाणार असा उल्लेख होता. तोच अर्थात् व्हाइसरॉयसाहेबांच्या लक्षात राहिलेला असून नुसते ' जाऊं द्या' असे लिहिण्याच्या ऐवजी 'केपपर्यंत जाऊ द्या' असे लिहिले गेले पण त्याने आमचा मात्र केवढा घोटाळा झाला पहा ! आम्ही केप- कडून गेलो काय किंवा सुएझकडून गेलो काय आम्हास व सरकारास दोनहि सारखीच होती. केपकडून जाणाऱ्या बोटीस वीस दिवसांचा उशीर म्हणूनच सुएझकडून जाणाऱ्या बोटीवर आयत्या वेळी जागा मिळविली व व्हाइसरॉयसाहेबांच्या तारेत केपचा उल्लेख होण्याचे साधारणतः काही कारणहि नव्हते. कारण त्यांची शर्त मान्य करावयाची म्हटली तरी आम्ही केपला अडकून पडावयाचे ते सुएझला अडकून पडलो असतो. दोनहि प्रवासमार्ग सुरू आहेत व दोनहि ठिकाणी आ- म्हास सरकारला अडकवून ठेवता येणे शक्य असल्यामुळे दोनहि मार्गोची फलश्रुति एकच होती. पण नाही. दैवयोग उलटा व्हावयाचा म्हणजे तो असाच ! व्हाइसरॉय आपणाकडून परवानगी देऊन आमची सोय काढण्याकरिता धाडलेल्या तारेत सहज ' केपमार्गे' असे शब्द घालतात पण आमची आदल्याच दिवशी बदललेली बोट प्रायः केपमार्गे जाणारी असताहि या खेपेस ती सुएझमार्गे जावयास निघते ! 'केपपर्यंत' हे शब्द वास्तविक निरर्थक आहेत ते सहजासहजी अर्थवादा- दाखल चुकून पडले आहेत. आम्ही व्हाइसरॉयसाहेबांची शर्त मान्य केल्यास आम्ही केपकडून गेलो काय किंवा सुएझकडून गेलो काय त्याना दोनहि सारखीच आहेत म्हणून आपण निवळ शब्दावर फारसे जाऊ नका. तारेचा खरा हेतु म्हणजे आम्हास परवानगी देण्याचा व्हाइसरॉयसाहेबांचा खरा हेतु आपण लक्षात आणा. बोट बंदरात आहे. सामान धक्क्यावर आहे. तिकिटे आमच्या हाती आहेत. थोडासा सारासार विचार चालवून परवानगी देण्याचे तुमच्या हाती आहे. तेव्हा कृपा करून