पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ 2 कोलंबाची सफर ४५ डेप्युटनची मंडळी कोलंबोस कधीतरी येणार सोयी काय पाहिजेत' वगैरे मजकु राच्या पाठविलेल्या सर्व तारा येथील सेन्सारने दडपून ठेवल्या होत्या व आम्ही स्टेशनावर अमक्या दिवशी येणार ही बातमी आमच्या कोलंबो येथील स्नेहीमंड- ळीस अखेर पर्यंत प्रत्यक्ष अशी मिळू दिली नाही हा अनुभव ताजा होताच. तेव्हा टिळकानी सेक्रेटरीस विनंति केली की आम्ही व्हॉइसराय त स्टेटसेक्रेटरी यांच्या तारा लिहून देतो व पैसे देतो. पण तारा तुम्ही पाठवाल तर पोचतील. तेव्हा सेक्रेटरी म्हणाले की तारा मला पाठविता येणार नाहीत. पण मी ' सेन्सा- रला सांगून तुमच्या या ताराना प्रतिबंध होऊ नये असे मात्र करतो. अखेर सेक्रेटरीच्या हपिसातच बसून तारा लिहिल्या व पाठविल्या व तारांच्या उत्तराची वाट पहात मंडळी घरी येऊन बसली. डेप्यूटेशन ता. ५ रोजी जाणार अशा समजुतीने बाहेरगावाहून तारा व पत्रे येतच होती. हिंदुस्थानातील लोक डेप्यूटे- शन आगबोटीत बसून निघाल्याच्या तारेची वाट पहात बसले होते. अशा वेळी 'डेप्यूटेशन जावयाचे थांबले सरकाराकडून डेप्यूटेशनला प्रतिबंध झाला. दिलेले पासपोर्ट परत मागितले. डेप्यूटेशनची मंडळी परत हिंदुस्थानाकडे निघणार " अशी तार प्रसिद्ध करण्याची वेळ यावी हा कोण विलक्षण योगायोग ! पण सर- कारच्या लहरी व मनवी स्वभावाने तो आणला खरा. ८८ व्हाइसरॉयसाहेबांच्या तारेतच बंदीचा हुकूम विलायत सरकाराकडून आल्याचा मजकूर असल्यामुळे व्हाइसरॉयसाहेबास केलेल्या तारांचा फारसा उपयोग होण्याची आशा कोणासच फारशी नव्हती. 'आमच्या हाती या बाबतीत काही नाही' असे मोघम उत्तरच बहुधा व्हाइसरॉयसाहेबाकडून येईल असे वाटून व हिंदुस्थानाकडे परत फिरावे लागणार असे वाटून आमच्यापैकी काही मंडळींनी सिलोनची जुनी राजधानी कँडी हे शहर पहाण्यास दोनप्रहरी निघण्याचे ठरविले; व रा. गोखले हे आदल्या दिवशी कलोनियल सेक्रेटरीस कबूल केल्याप्रमाणे सर्व पासपोर्ट त्यांच्या स्वाधीन करण्याकरिता सेक्रेटरीयट हॉलमध्ये गेले. त्यानी पासपोर्ट परत केले त्यावरील मंजुरीचे शेरे खोडले जाणार इतक्यात फिरून एक आशेची लाट उठली. व्हाइसरॉयसाहेबाकडून कोलंबोसरकारास अशी तार येऊन धडकली की " टिळक व डेप्युटेशनची मंडळी यांच्या तारा पोचल्याप्रमाणे टिळकाना व त्यांच्या बरोबरच्या मंडळीला परवानगी देण्याचा प्रश्न मी विलायत सरकारकडे तारेने धाडला आहे. दरम्यान तूर्त तुम्ही वाटेल तर असे करावे - हल्ली जी बोट केपला -दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकाच्या केप ऑफ गुड होपला-केप कॉलोनीला जात आहे तिजवरून टिळक वगैरेना हवे तर जाऊ द्या. पण ही परवानगी फक्त पपर्यंतची देता येईल. मात्र दरम्यान विलायतसरकारने जर आपला पूर्वीचा हुकूम फिरविला नाही तर त्याना केपहून परत यावे लागेल. हे त्यास तुम्ही स्पष्ट बजवावे व हे त्यास सर्वस्वी कबूल असेल तर त्यास बोटीवर जाऊ द्यावे.”