पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ लो० टिळकांचे चरित्र भाग ३ डेप्युटेशनचा फोटो काढून झाला. सामानसुमान पुरे बांधले जाऊन त्यावर बोटींची तिकिटे डकविण्यास सुरवात झाली. लॅकेशायर वोट दोन तासानी बंदरात येणार अशी बातमी आली. टिळकानी अखेरच्या जरुरीच्या चिठ्याचपाट्यावर सह्या करून दिल्या. दारात गाड्या व मोटारी उभ्या होत्या. त्यात वसून आता फक्त उपवनोपहारसमारंभास जावयाचे व परत येताच तसेच थॉमस कुकच्या मनुष्याचे स्वाधीन सामान करावयाचे इतकेच काय ते काम उरले. इतक्यात पालबाबूंच्या पासपोर्टवर मंजुरीचा शेरा घेण्याचा उरला होता त्याकरिता रा. गोखले हे कलोनियल सेक्रेटरीच्या ऑफिसात गेले होते ते बातमी घेऊन धांवत सांगत आले की “पालबाबूंचा पासपोर्ट सेक्रेटरीनी ठेऊन घेतला. तो तर ते परत देत नाहीतच. पण बाकी सर्वांचे पासपोर्टहि रद्द करण्याचा हुकूम तारेने आलेला असून काल मंजूर करून दिलेले सर्व पासपोर्टहिं परत आणून स्वाधीन करा असे सेक्रेटरी म्हणतात ! " प्रथम याचा अर्थच आम्हास कळेना. तेव्हा टिळक- प्रभृति आम्ही सर्व मंडळी ताबडतोब सेक्रेटरीच्या भेटीस गेलो. पण त्यानी सांगितले की ' दिल्लीहून एक व मद्रासेहून एक अशा दोन सरकारी हुकमाच्या तारा नुकत्याच आल्या असून त्याअन्वये तुम्हा सर्वांचे पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत. तुम्हापैकी टिळक व केळकर यास मी आताच पत्रे रवाना करवीत होतो तो तुम्हीच सर्वच आला बरे झाले. ' हे ऐकून आमची स्थिति अत्यंत चमत्का- रीक झाली. आम्ही कोणी न जातो तर ही पत्रे आम्हास आज सकाळी म्हणजे बोटीवर जाण्यास निघण्याच्या क्षणी हाती पडली असती. किंबहुना तसेहि झाले नसते ! कारण लँकेशायर बोट काल सायंकाळीच कोलंबोस येऊन दाखल झालेली असून आज सकाळी आठ वाजताच ती निघणार होती. अर्थात् सामान तर पुढे बोटीवर आधीच गेले असते व पत्रे हाती पडावयाच्या आधीच आम्ही बोटीच्या धक्यावर जाऊन पोचणे संभवनीय होते. पण पत्रांची व आमची चुकामूक झाल्याने बोट सांपडणे मात्र शक्य नव्हते. कारण कलोनियल सेक्रेटरीनी आम्हास असे सांगितले की ' तुम्हास पत्रे न पोचती तरी सुद्धा बोटीवर चढताना तुमचे पासपोर्ट काढून घेऊन तुम्हास बोटीवर चढण्यास प्रतिबंध करावयाचा असे आमच्या सरकारने ठरविले होते. ' "आता पुढे काय ? कोलंबो येथील अधिकाऱ्याचे हाती काहीच नव्हते. आमचे हाती दिलेल्या पत्रातील मजकुरावरून पाहता खुद्द विलायतसरकारच्या हुकमा- बरून आम्हास ही बंदी करण्यात आली आहे असे दिसले. अर्थात दिल्लीसरकार तरी या बाबतीत काय करू शकेल हाही प्रश्नच होता. तथापि एक वेळ व्हाईसरा- साहेबाकडे तारानी अर्ज करून पहावे असे ठरवून स्वतः टिळक व खापर्डे यांच्या नावची एकेक व डेप्युटेशनच्या तर्फे माझ्या नावची एक अशा तीन तारा पाठ- विण्याचे ठरले. पण आमच्या तारा तरी कोण पाठवू देणार ? तारेची खुंटीहि सर- कारच्याच हाती. त्यातहि आम्ही परस्वाधीनच. गेल्या पंधरा दिवसात 'टिळक व