पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ कोलंबोची सफर ४३ मिळत नाही असे पंधरा दिवस पाहून आम्ही प्रथम बी. बी. लाइनर कंपनीच्या लँकेशायर नामक बोटीने कोलंबोहून जाण्याचे ठरविले. पण ता. ३ ला या बोटीने जाण्याच्या ऐवजी ता. ५ रोजी जपानी कंपनीच्या इयोमारू नामक बोटीने गेल्यास मंडळीची सोय प्रवासाच्या दृष्टीने अधिक होईल असे मुंबईस एका तज्ज्ञ व अनुभविक गृहस्थाने फारच आग्रहाने सांगितल्यावरून जपानी बोटीने जाण्याचे आम्ही मुक्रर केले होते. कोलबोस ही जपानी बोट ता. ५ रोजी यावयाची असा अदमास होता. त्याप्रमाणे आम्ही व आमचे एजंट थॉमस कुक कंपनीचे लोक बोटीची वाट पहात होतो. ता. ३ रोजी सायंकाळी मी येथील कलोनियल सेक्रेटरीकडे पासपोर्ट मंजुरीकरिता गेलो. आम्हास मुंबईस पासपोर्ट मिळाले होते. व ते सर्व हिंदुस्थानात चालले असते. पण सिलोन ही क्राऊन कॉलनी. येथील सरकार वेगळे असल्याने आमच्या पासपोटीवर येथील सरकारचा मंजुरीचा स्वतंत्र शेरा हवा होता व तो सदर सेक्रेटरीनी ताबडतोब करूनहि तिला. पासपोर्ट घेऊन मी तसाच थॉमस कुक कंपनीकडे गेलो व तिकिटे काढली काय म्हणून विचारले तो त्यानी सांगितले की 'तुमची जपानी वोट आहे कुठे ? ती उद्या कोलंबोस याव- याची होती खरी पण आता पहातो तो नुकतेच तिने जपान सोडले असून ता. २३ पर्यंत ती कोलंबोस येत नाही!' हे ऐकून मला काय वाटले असेल ? "आणखी २० दिवस कोलंबोस पाहुणचार खात पडून राहण्याची कल्पना दुःसह होती. पाहुणचार फार गोड होता. येथील मंडळींच्या सहवासात महिनेच्या महिने घालविले तरी कंटाळा येणे शक्य नव्हते. पण २० दिवस व्यर्थ कसे घालवावयाचे ! विलायतचे कामहि पुढे ढकलले जाणार! आधीच बोटीवर ४५ दिवस लागणार त्यात या २० दिवसांची आणखी भर ! पण जपानी बोटीवरून जाण्याचे ठरण्यापूर्वी ज्या लंकेशायर बोटीवरून जाण्याचे आम्ही प्रथम मुंबईस ठरविले होते तिची आठवण मला होती. ती याच सुमारास कोलंबोत येणार होती. अर्थात् 'इयोमारू ' मिळत नाही तर 'लॅकेशायर' का होईना ? तिच्यावर जागा मिळवून द्या म्हणजे झाले असे मी थॉमस कुकच्या एजंटास सांगितले व त्यानी ताबडतोब टेलिफोन करून माहिती मिळवून " होय सात जागा तुम्हाला दिल्या आहेत " असे उत्तर आम्हास जागच्या जागी मिळवून दिले ! यामुळे एका पांच मिनिटांचे आंत विलायतेस जाण्याच्या निराशेचे दुःख व फिरून निराशेच्या जागी आशा उत्पन्न झाल्याचे सुख मला अनुभवावयास सांपडले ! व ज्या लँकेशायर बोटीचा आम्ही जाणूनबुजून पूर्वी अव्हेर केला तिनेच आम्हास आयत्या वेळी हात द्यावा हा योगायोग विलक्षण खरा असे म्हणून मी घरी परतलो. दैवलीलेच्या या लहानशा धक्क्याने आमची प्रवासाची हुरूप फिरून ताजी झाली व सामानसुमानाची उरली सुरली तयारी पुरी करण्यास डेप्युटेशनच्या मंडळीनी आरंभ केला. "ता. ४ रोजी सकाळी पालबाबूंचे व्याख्यान झाले. दोन प्रहरी जेवणानंतर येथील हिंदी मित्रमंडळीच्या आग्रहावरून फोटो घेण्याचे काम सुरू होऊन