पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ लो० टिळकांचे चरित्र भाग ३ निघालो. वाटेत विजापूर येथील मंडळीकडून लो. टिळक यास फार दिवसांचे निमंत्रण होते म्हणून तेथे अर्धा दिवस मुक्काम करून मद्रासेस ता. ३० रोजी येऊन पोचलो. मद्रासेस एक दिवस विश्रांति हवीच होती. शिवाय मिसेस बेझंट यानी अड्यार येथे वाटेत उतरण्याचे टिळकाकडून पुण्यास अभिवचन घेतले होते. यामुळे मद्रासेस दीड दिवस मुक्काम पडला. या मुक्कामात मद्रास शहरातील सर्व जातींच्या व सर्व पक्षांच्या पुढाऱ्याकडून टिळकांचा सन्मान उत्तम प्रकारे करण्यात आला व डेप्युटेशनला अतिशय प्रेमपूर्वक निरोप देण्यात आला. मद्रास इलाख्या- तील पुढारी व सुशिक्षित लोकांचे मत टिळकासंबंधाने व डेप्युटेशनच्या कामा- संबंधाने काय आहे हे मद्रास येथील प्रचंड जाहीर सभेत मद्रासेतील सर्व प्रमुख राजकीय व इतर सार्वजनिक संस्थानी मिळून जे संयुक्त मानपत्र दिले आणि विशेषतः सर सुब्रह्मण्य अम्बर यानी जे भाषण केले त्यावरून कळून येण्यासारखे आहेच. भद्रासेहून निघाल्यावर पुढे कोलंबोपर्यंत वाटेत कोठेहि मुक्काम करावयाचा नाही असे ठरले होते. तथापि वाटेतील लहानमोठ्या अनेक स्टेशनावरून टिळ- कांचा अतिशय थाटाने सत्कार करण्यात आला. तंजावर त्रिचनापल्ली मदुरा वगैरे ठिकाणी जो थाट व उत्साह आणि समारंभात जो व्यवस्थितपणा दिसून आला तो अपूर्व होता. लहानसान स्टेशनावर गाडी उभी रहात नाहीं तथापि गावो- गावच्या लोकानी रात्री दोन दोन तीन तीन वाजता टिळकाना पहाण्याची संधि मिळणे शक्य नसता किंवा आपला आवाज त्यांच्या झोपेत त्यांच्या कानी जाण्याचीहि आशा नसता स्टेशनावरील प्लॅटफॉर्मवरूनच काय पण रस्त्याच्या बाजूलाहि उभे राहून 'टिळक महाराजकी जय' अशी आरोळी मारून त्यांचा सत्कार करण्याची आपली हौस कशी तरी फेडून घेतली. "कोलंबो येथेहि हिंदी व सिंहली मंडळीनी टिळकांचे व डेप्युटेशनचे थाटाने स्वागत केले. टिळक व पाल या दोघांची दोन व्याख्याने झाली. पहिल्या व्याख्या- नास सर अरुणाचलं सीलोन येथील पहिल्या प्रतीचे नागरिक व दुसऱ्या व्याख्या- नास मि. डिमेल सी. बी. ई. कोलंबो येथील एक पुढारी हे अध्यक्ष होते. उप- वनोपहारप्रसंगी कोलंबो येथील कमीत कमी दीड हजार प्रमुख स्त्रीपुरुष हजर होते. टिळकांच्या व पालबाबूंच्या व्याख्यानास सुमारे दीड-दोन हजार रुपये जमले ते तेथील माजी लोकप्रिय गव्हर्नर सर अँडरसन यांच्या स्मारकास देण्यात आले. डेप्युटेशनकरिता मंडळीनी स्वतंत्र फंड काढण्यास सुरुवात केली असून पाचपाचशेचे काही आकडे पडले आहेत. "ता. २ व ३ हे दिवस डेप्युटेशनच्या मंडळीस व त्यांचा सत्कार करणाऱ्या कोलंबो येथील नागरिकास मोठ्या गर्दीचे गेले. मुंबईस सामानसुमान बरेच खरेदी झाले होते; तथापि काही खरेदी व्हावयाचे राहिलेच होते ते होऊन बांधा- बांध जोराने सुरू झाली. इतक्यात ता. ३ रोजी विलायतच्या सफरीची अनपे- क्षित रीतीने डळमळ होण्याची सुरवात झाली. पी. अँड ओ. ची आगबोट