पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ कोलंबोची सफर ४ १ ठराव मंजूर झाल्यावर विपिनचंद्रपाल खापर्डे व टिळक यानी भाषणे केली. टिळकांचे भाषण विस्तृत व भावनापूर्ण असे झाले. आणि आरंभिलेले कार्य ही एक प्रकारे 'ईश्वरी प्रेरणा'च वाटत असल्याने या कार्यात आपणास यश येईल अशी आशा प्रगट करून त्यानी परिषदेची रजा घेतली. शेवटी (बुधवारी) ता. २७ रोजी सकाळी वैदिक मंडळीनी ठाकुरद्वारचे देवळात टिळकाना आशीर्वाद दिला. दोन प्रहरी मुळजी जेठा मार्केटात मन- मोहनदास रामजी यांचे विद्यमाने व्यापाऱ्यानी पानसुपारी व पंधरा हजार रुपये दिले. सायंकाळी डॉक्टर वर्गाची पानसुपारी होऊन चायना बागेत शिष्टमंडळाचे फोटो काढण्यात आले. तेथून सर्व मंडळी मिरवणुकीत सामील होऊन बोरीबंदर स्टेशनावर गेली. व्यवस्था अशी केली होती की बोरविंदराहून स्पेशल ट्रेनने शिष्टमंडळ कल्याणापर्यंत जावे व तेथे तासभर थांबून मागून येणाऱ्या मद्रास मेलने पुढे जावे. त्याप्रमाणे प्रवासाला सुरवात झाली. टिळक व शिष्टमंडळाचे लोक कोलंबोपर्यंत गेले पण तेथे पासपोर्ट रद्द झाल्या कारणाने त्याना परत यावे लागले ही गोष्ट प्रसिद्धच आहे. या दरम्यानच्या हकीकतीचे एक विस्तृत पत्र केळकर यानी केसरीला पाठविले होते तेच या खाली दिले आहे व त्यावरून या छोट्या व निष्फळ सफरीची थोडक्यात कल्पना येईल. (११) कोलंबोची सफर " "मनसा चिंतितं कार्यं दैवमन्यद्विचिंतयेत् ' या म्हणीचा अनुभव पावलो - पावली मनुष्याला येत असतोच. पण स्वराज्यसंघाच्या शिष्टमंडळाला तिचा काल जो अनुभव आला तो मात्र आश्चर्याने थक्क करून सोडणारा होता. आज सकाळी मी लिहीत बसलो आहे यावेळी टिळकप्रभृति डेप्युटेशनची मंडळी कोलंबोच्या बंदरात जाऊन आगबोटीत बसण्याच्या धांदलीत असावयाची. पण दैवाची लीला अशी की याच वेळी विलायतेस जाण्याची तयारी न करिता त्यानी परत हिंदुस्थानाकडे जाण्याच्या तयारीस लागावे ! ही बातमी वाचून केसरीचे हजारो वाचक डोळे चोळचोळून आपण स्वप्नात आहो की जागे आहो असा विचार करू लागतील, पण सरकाराने लोकाना अशा रीतीने आश्चर्यचकित करून सोडण्या- सारखे खेळ आजवर अनेक केले. त्यातलाच हाहि एक आहे व आणखी असे किती खेळ आपणा लोकास पाहावयाचे आहेत न कळे ! "असो. विलायतेस हिंदी स्वराज्यसंघामार्फत शिष्टमंडळ पाठविण्याचा बेत नक्की करून त्याची साधनसामुग्री जुळविण्यास प्रारंभ झाल्यापासूनची हकीकत केसरीतून वेळोवेळी प्रसिद्ध झालीच आहे. मुंबईहून निघणाऱ्या एखाद्या आग- बोटीत जागा मिळाली तर पहावी अशा हेतूने केलेले सर्व प्रयत्न निष्फळ झाल्या- वर कोलंबो येथे येऊन आगबोटीवर बसण्याचा बेत करावा लागला व त्याप्रमाणे मुंबईहून सामानासुमानाची सर्व तयारी करून आम्ही सर्व मंडळी ता. २७ रोजी