पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४० लो० टिळकांचे चरित्र भाग ३ त्याला काही प्रतिकार करण्याकरिता टिळक जात आहेत ही मर्माची गोष्ट अध्यक्ष गंगाधरराव देशपांडे यानी सांगितली ती त्याना अतिशय पटली. सोळा हजार मजुरानी प्रत्येकी एकएक आणा देऊन एक हजार रुपयांची थैली तयार केली होती ती टिळकाना अर्पण करण्यात आली. सोमवार ता. २६ रोजी आण्णासाहेब नेने यांचे घरी पैसाफंडातर्फे सत्कार झाला. सायंकाळी सात वाजता शे० मुरारजी गोकुळदास यांच्या चायना बागेत चमनजी यानी टिळकाना उपहारसमारंभाला बोलाविले होते. रात्री दहा वाजता दाणे बंदरावर सभा झाली. या सभेत जागच्या जागी वर्गणी जमविण्याकरिता हॉर्निमन यानी आपली टोपी फिरविली. त्यात १५०० रुपये पडले. व कार्यक्रमाच्या छापील पत्रकावर टिळकांची सही घेऊन एका कल्पक गृहस्थाने त्याचा लिलाव केला त्यात पाचशे रुपये मिळाले. चायना बागेत स्त्रियां- चीहि वेगळी सभा भरविण्यात आली. शेवटी शांतारामाच्या चाळीत सर्व नाग- रिकातर्फे म्हणून सभा झाली तिला बॅ. जिना हे अध्यक्ष होते. ता. २६ रोजी रात्री चौपाटीवर फ्रेंच पुलाजवळ मुद्दाम उभारलेल्या मांडवात हिंदी स्वराज्यसंघाची मोठी परिषद भरली होती. ७-८ शे प्रतिनिधी आले होते. मुंबईचे होमरूलर म्हणून मनमोहनदास यानी स्वागत केले. परिषदेला सहानुभूति दर्शविणाऱ्या १४०० तारा व ६१७ पत्रे आली होती. स्वराज्य- संघाचा अहवाल वाचून दाखविण्यात आला त्यावरून असे दिसून आले की एकंदर सभासद ३३८५४ पटावर होते. शंभर रुपये देऊन झालेले तहाहयात सभासद ६४१ होते. मुख्य शाखा पुणे मुंबई वन्हाड मध्यप्रांत व बंगाल या ठिकाणी होत्या. संघाने सहा इंग्रजी पुस्तके व १३ मराठी पुस्तके छापली. दोन्ही मिळून सुमारे दीड लाख प्रती छापल्या वाटल्या किंवा विकल्या. संघातर्फे ४३५ जाहीर व्याख्याने झाली. त्यात टिळकानी ८८ दिली होती. बऱ्हाड नागपूरच्या दौऱ्यात सोळा दिवसात रेल्वेने एक हजार व मोटारीने एक हजार मिळून दोन हजार मैलांचा टिळकांचा प्रवास होऊन त्यानी त्या अवधीत ३२ व्याख्याने दिली. काँग्रेसच्या दिवशी बेझन्टबाईचा संदेश सर्व शाखामार्फत गावोगाव वाचून दाखविण्यात आला व माँटेग्यूकडील अर्जावर महाराष्ट्रातील दोन लक्ष सह्या घेण्यात आल्या. सालगुदस्त संघाजबळ १३१३२ रु. शिल्लक होती. चालू सालात ता. २० मार्चपर्यंत तहाहयात सभासदांची वर्गणी १०२९३ रु. इतर सभासदांची वर्गणी १३७७९ देणगी १३२८२ पुस्तकविक्री २२६३ दौऱ्या- तील डेप्युटेशन फंडाला मदत ११७००० रुपये व मुंबईत शेवटच्या दोन दिव- सात जमा झालेली रकम रु. ४८००० असा हिशेव सांगण्यात आला. पैकी बॅपटिस्टा यांच्या सफरीकरता २३ हजार रु. खर्च झाला. छपाईकरिता पांच- हजार प्रवास खर्च चार हजार हे वजा जाता सदर तारखेला संघाजवळ १ लक्ष ८२ हजार ९५७ रुपये शिल्लक राहिली असे जाहीर करण्यात आले. नंतर शाखा- निहाय संघाचे रिपोर्ट वाचण्यात आले. शिष्टमंडळाला निरोप देण्याचा