पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ टिळकांचा मोठा दौरा ३९ रोजी बंडगार्डनजवळ खंडवानी मॅन्शन येथे पुणे व लष्कर येथील अनेक वर्गातर्फे पानसुपारी व वनोपहार यांचा समारंभ फारच थाटाचा करण्यात आला होता. सदर प्रसंगी नेमस्तपक्षातर्फे हरी नारायण आपटे वगैरे अनेक गृहस्थ हजर असून आपटे यानी टिळकाना आदरपूर्वक निरोप दिला. ता. २३ मार्च रोजी सार्व- जनिक सभेतर्फे असाच निरोप देण्याचा समारंभ झाला व पेठेनिहायहि पान- सुपाच्या झाल्या. यापूर्वी दादासाहेब खापर्डे हेहि टिळकाबरोबर जाण्याकरिता पुण्यास आले होते. त्यांचे स्वागत करून त्यानाहि निरोप देण्यात आला. . शनिवार ता. २३ रोजी रात्री दहा वाजता शिष्टमंडळ पुण्याहून निघाले तेव्हा टिळकांच्या वाड्यापासून रास्ता पेठेपर्यंत लोकानी कमानी व तोरणे उभारली होती. आठ वाजल्यापासून रस्त्यात लोकांची दाटी झाली होती. मिरवणुकीबरोबर १००।२०० दिवे होते. तो सर्व दिवस व रात्री गाडीत पाय ठेवीपर्यंतचा वेळ टिळकांचा अतिशय धांदलीचा गेला. अडली उरली कामे निकालात निघाली. कोणाला शिफारशीची पत्रे चिठ्या चपाळ्या द्यावयाच्या त्या देऊन झाल्या. मुला- संबधाची व्यवस्था झाली. ताईमहाराज प्रकरणाचा सर्व निकाल लागून गेल्यामुळे श्रीजगन्नाथमहाराज यांच्या हातात त्यांची बहुतेक सर्व इस्टेट आली होती. " या प्रकरणात आपणाकडून जो खर्च करण्यात आला होता त्याच्या परत फेडीची काही व्यवस्था मजकडून करवून घ्या" असे जगन्नाथमहाराजानी आग्रहपूर्वक व विनंतिपूर्वक सांगितल्यावरून ताईमहाराज प्रकरणातील वकील गोपाळ मोरेश्वर पटवर्धन व हायकोर्ट वकील जगन्नाथ रघुनाथ घारपुरे या दोघाकडे एक निवाड पत्र तयार करण्याचे काम टिळकानी जगन्नाथमहाजाना सांगितले होते. त्यांचीहि बैठक याच दिवशी होऊन उभयतानी एकंदर हिशेबाचा आढावा घेऊन उरल्या बाकीला लवादी निकालाचे स्वरूप देऊन तो टिळकासमक्ष जगन्नाथमहाराज यांचे स्वाधीन केला. शिलकी उरलेले कागदपत्र व पत्रव्यवहार यांची व्यवस्था करण्यात बराच वेळ गेला. अशा रीतीने सगळे काम गर्दीने संपवून टिळक व खापर्डे गाडीत येऊन बसले. या मंडळीकरिता राखून ठेवलेले हवे स्टेशनावर गर्दी होऊ नये म्हणून रस्त्यालगतच्या एका सायडिंगवर आणून ठेवले होते. तेथपर्यंत मिरवणुकीची गर्दी आली व तीतूनच टिळकानी कसाबसा डब्यात पाय ठेवला. मुंबईस पोचल्यापासून कार्यमालिकेला सुरवात झाली. सकाळी ते अस्पृश्यता निवारक परिषदेला गेले. दोन प्रहरी तीन वाजता मारवाडी विद्यालयात शे० गोविंद लालजी यांचे अध्यक्षतेखाली केवळ मारवाडी समाजाची सभा झाली व पंधरा हजारांची थैली दिली. वर्ध्याचे शे० जमनलाल बजाज यानी स्वयंसेवक होऊन सभेची सर्व व्यवस्था ठेविली होती. ता. २५ रोजी रात्री एल्फिन्स्टन रोड- वर सुमारे ४० गिरण्यातील कामगारानी पानसुपारी केली. लॉर्ड सिडेनहॅम यांच्या कारकीर्दीत टिळकाना शिक्षा होऊन मजूर वर्गानी अलोट सहानुभूति व्यक्त केली होती. तेच लॉर्ड सिडेनहॅम आज विलायतेत विरोध करीत आहेत आणि