पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ लो० टिळकांचे चरित्र भाग ३ विलायतेस गेल्यावर मगच त्यांचा विचार त्याना कर्तव्य होता. अर्थात् यापुढील कार्यक्षेत्र विलायतेतच उपस्थित होणार या भावनेने टिळकानी विलायतेस जाण्या- चे पक्के ठरविले. विलायतेहून बॅ. बॅप्टिस्टा यांचे अभिप्राय कसे येत होते व तगादा कसा होता हे पुढे दिलेल्या त्यांच्या काही पत्रावरून दिसून येईलच. चिरोल खटल्यात साक्षी पुराव्याकरिता इकडे कमिशन पाठविण्यात आले होते व त्या- पुढील पुरावा दाखल करण्याचे उभय पक्षी काम संपले होते. कोंकण वन्हाड नागपूर कर्नाटक वगैरे अनेक भागातील दौरेहि आटोपले होते. इतर शेकडो ठिकाणची निमंत्रणे होती पण त्या त्या भागात जावयाचे म्हटले तर टिळकाना एक वर्षहि आणखी पुरले नसते. पण यापूर्वीच अनेक लोक स्वराज्यसंघाचे तहाहयात सभासद झाले होते. त्यानी वर्गण्या व देणग्या पाठविल्या होत्या व अर्जावर सह्याहि केल्या होत्या. यामुळे स्वतःपुरते इकडील काम येथेच थांबवून टिळकानी विलायतेत जाण्याचे ठरविले. कारण पासपोर्टहि आता मिळाले होते. सोलापूर येथे ता. १९ मार्च रोजी जाऊन टिळक परत आले. तेथे त्यांची व्याख्याने होऊन ९ हजारांची थैली अर्पण करण्यात आली. नंतर पुण्याहून निघ- ण्यापूर्वी ता. २१ मार्च रोजी रेमार्केटात मोठी जाहीर सभा भरली. शे. किका- भाई मोतीवाले हे अध्यक्ष होते. मुख्य ठराव शिवरामपंत परांजपे यानी मांडला. तो मांडताना परांजपे यानी सांगितले की "हिंदुस्थानाला स्वराज्य मिळू नये म्हणून विलायतेत मोठी चळवळ सुरू आहे. पेनशनरापासून विद्यार्थ्यापर्यंत अनेक इंग्रज लोक या चळवळीत सामील झाले आहेत पण इकडे या वर्गावर सरकाराने आपली कदर चालवून त्याना चळवळीत पडण्याची बंदी केली आहे. लॉर्ड सिडेनहॅम हे आता निवळ पेन्शनर आहेत. तरी पण त्यानी युद्धाला मदत म्हणून नव्हे तर विरोधी चळवळीकरिता लाखो रुपयांचा फंड जमविला आहे. पण सुदैवाने प्रधान- मंडळ व इकडील अधिकारी मंडळ याना हिंदुस्थानास काही थोडे तरी हक्क द्यावे असे वाटू लागले आहे. तरी तारतम्य भावाने त्यांचे समर्थन करून विलायतेतील लोकमत जागृत करण्याकरिता आपण इकडून शिष्टमंडळे पाठविली पाहिजेत. " नंतर पुणेकरातर्फे अकरा हजार तीनशे रुपयांची थैली मानपत्र व पोषाख टिल- काना देण्यात आला. उत्तर देताना टिळक म्हणाले " रिकामा न्हावी कुडाला तुंबड्या लावी ” या म्हणीप्रमाणे लॉर्ड सिडेनहॅमसारखे लोक सुखासुखी आमच्या विरुद्ध चळवळ करीत आहेत. आणि आपण इतके दुःखात असता गप्प बसावे काय ? पण विलायतेतील लोकमत थोडे बहुत आम्हाला अनुकूल होत चालले आहे हे तिकडील सभा व परिषदा यांच्या ठरावावरून दिसून येत आहे. म्हणून काही थोडी खटपट करण्याकरिता शिष्टमंडळे जात आहेत. तथापि तिकडे व इकडे मनोमन साक्ष ठेवून चळवळीचा ध्वनी प्रतिध्वनी सारखा चालू राहिला पाहिजे. वीण्याच्या तारेचा ध्वनी घुमविण्याला तंत्रोऱ्याच्या भोपळ्याचे जसे सहाय्य होते तसे इकडील लोकमताने आम्हाला तिकडे पाठिंबा दिला पाहिजे. नंतर ता. २२