पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो० टिळकांचे चरित्र भाग १ दिसून येईपर्यंत तो ब्रिटिश सरकारचा व त्या सरकारशी करवीर दरवारचे संबंध पूर्ण सख्यत्वाचे असल्याने-करबीर दरबारचा शत्रु आहे असे मानून चालणे भाग आहे व त्याचेशी संबंध ठेवणाऱ्या अगर त्याजकडे वारंवार जाणाऱ्या लोकांच्या ठिकाणी उभय सरकाराबद्दल स्नेहभाव नाही असे मानले पाहिजे. सबब ज्याना म्हणून कर- वीर सरकारचा कोणतेहि प्रकारचा आश्रय आहे अगर या सरकारातून ज्याना पदवी वगैरे मान मिळाला आहे अशा लोकानी, विशेषतः इनामदार वतनदार किताब धारण करणारे दरवारचे हरएक दर्जाचे नोकर पेन्शन्दार व सरकारी व सरकारने मान्य केलेल्या शाळातील शिक्षक व इतर नोकर यानी टिळकाशी कोण- त्याहि प्रकारचा संबंध ठेविता कामा नये अशी श्रीमन्महाराम छत्रपति साहेब सर- कार करवीर यांची आज्ञा आहे. अशा लोकापैकी कोणाकडूनही याविरुद्ध वर्तन झाल्यास हुजुरून अत्यंत दोपाई असे समजले जाऊन त्याबद्दल व्यक्तिविषयक विचार होऊन योग्य ते शासन करण्यात येईल. शाळातील विद्यार्थ्यांनी टिळकाची भेट घेऊं नये अगर त्याच्याशी कोणताही संबंध ठेवू नये अशाबद्दल सरकारने मान्य केलेल्या सर्व शाळाच्या व्यवस्थापकानी पूर्ण खबरदारी घेतली पाहिजे. टिळक व त्याचे महशूर अनुयायी ज्यांचा नेहमी ब्रिटिश सरकारच्या राज्यकारभाराविरुद्ध लोकमत तयार करण्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सारखा प्रयत्न चालू असतो त्यांच्याशीही उपरिनिर्दिष्ट करवीर दरवारच्या प्रजाजनानी संबंध ठेवू नये अशीही हुजूरची आज्ञा आहे. आणि तशा प्रकारचा संबंध कोणी उघड किंवा गुप्तपणे ठेविल्याचे दिसून आल्यास त्याबद्दल केव्हाही उपेक्षा केली जाणार नाही. ही रामज एकदाच दिली आहे. पुनः या बाबतीत सवलतीचा विचार होणार नाही व या आज्ञेचे उल्लंघन करणारास क्षमा केली जाणार नाही. ' प्रत्यक्ष सरकारी नोकर टिळकाना भेटावयाला कशाला जाईल? येऊन जाऊन पेन्शनर खासगी शाळातील लोक व विद्यार्थी हेच टिळकाना भेटावयाचे. पण या हुकुमाना धाब्यावर बसविणारे पुष्कळ लोक भेटले. उलट ज्याना हा हुकूम लागू नव्हता अशानी केवळ भीतीने टिळकांचे नाव व घर वर्ज केले. 'लेकी बोले सु लागे.' एकाला धाक घातला की तो सर्वांना लागावयाचाच. वरील हुकुमानी गर्दी हटली असे नाही. कारण सरकारचा हुकूम ज्याना लागू होईल असे लोक आधी थोडे आणि त्यातूनहि तो न मानणारे काही होतेच. विद्यार्थी वगैरे लोकानी तर हुकूम मुळीच मानला नाही. त्याचप्रमाणे पोलीस ज्याना ओळखण्याची फारशी भीति नव्हती त्यानीहि आपल्या अप्रसिद्धीचा फायदा घेतला. सरकारने पहारा ठेवला असला तरी एक किंवा दोन शिपाई. ते काही नावे टिपून घेत. त्यातील काही खरी असत काही खोटी असत. पण नावे खरी असली तरी प्रत्यक्ष सरकारच्या तावडीत सापडणारे लोक त्यात किती असणार ? बरे, पोलिसानी तेथे काही सिनेमाचा कॅमेरा उभा केला नव्हता की येणारा जाणा- राचे फोटो फिल्मवर घ्यावे आणि ती पोलीस अधिकान्याला नेऊन उकलून दाख-