पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ टिळकांचा मोठा दौरा ३७ असे वाटत नसेल तर त्याने त्या विषयावर मुळीच न बोलावे हे बरे. मध्यप्रांत सर- कारच्या हुकुमावरून ही गोष्ट मी तुम्हाला कळवीत आहे. " पण हा उलटा न्याय नव्हे काय ? कारण टिळकानी पूर्वीच्या पुणे मुंबई येथील भाषणात व लेखात असे स्पष्ट उद्गार काढले होते की " सवड असता जो भारतरक्षक सैन्यात जाण्याला तयार होणार नाही तो खरा स्वराज्यभक्तच नव्हे असे मी म्हणेन. तुम्ही सैन्यात गेला नाही तर स्वराज्याची चळवळ निरुपयोगी म्हणून मी सोडून देईन." आणि स्वतः आपल्या मुलाला सैन्यात पाठविण्यास ते तयार झाले होते. असा पूर्वीचा इतिहास असता जर टिळकांची भाषणे लष्कर भरतीच्या उत्साहाचा भंग कर - णारी खरोखर होती असे सरकाराने मानले तर त्याचे इंगित काय असावे याचे अनुमान कोणालाहि करता येईल. पण टिळक हे लष्कर भरतीला विरोधी असे ठरवून ते कारण लावून टिळकाना दिल्लीस जाण्याची मनाई पूर्वीच करण्यात आली होती. व आता मध्य- प्रांताच्या सरकारचाहि तोच इरादा होता. अकोल्याच्या अधिकान्यानीहि यवत - माळ प्रमाणेच लेखी पत्र पाठविले व त्यात टिळकांच्या भाषणातील म्हणून काही उतारे दिले होते. पण जे इसम खरोखर इच्छा नसता अप्रत्यक्ष जुलमाने जबरीने जात असत त्याना उद्देशूनच त्यांचे शब्द होते. जो आपल्या इच्छेने जाईन म्हणतो त्याचा निरुत्साह करावयाचा ! कारण राजकारणाने त्याचे मन दूषित झालेले आहे ! आणि ज्याला राजकारण किंवा महायुद्ध यांची मुळीच माहिती नाही अशा लोकाना हातात बंदूक देऊन उभे करावयाचे किंवा लष्करच्या भाकरी भाजावयास लावा- वयाचे ! यात स्वारस्य काय ? अकोल्याच्या डे० कमिशनरने असेहि लिहिले की टिळकांच्या या भाषणाबद्दल त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला न केला तरी राष्ट्र- रक्षणकानूच्या २३ व्या कलमाखाली ती भाषणे येतील हे ध्यानात ठेवावे. पण या कायद्याने राष्ट्ररक्षणापेक्षा राष्ट्रभक्षणच अधिक होऊ पाहात होते. हा आक्षेप पूर्वीच टिळकाना माहीत होता. त्यावर त्यानी मार्च महिन्याच्या प्रारंभी पुण्यास वेन्ट बाईची व्याख्याने झाली त्यावेळी एका प्रसंगी उत्तरहि दिले होते. त्यात त्यानी असे म्हटले होते की "या आक्षेपाना उत्तर म्हणून मी एकदाच सर्व स्वराज्य- वादी लोकाकरिता प्रसिद्धपणे असे सांगून टाकतो की आम्ही सैन्यभरतीला पूर्ण अनुकूल आहो. साम्राज्य संरक्षणास सहाय्य करण्यालाहि आम्ही तयार आहो. ११।१६ रुपयाकरिता आम्ही कोणी सैन्यात जातो असे नाही तर या उच्च हेतूनेच. पण स्वराज्याकरिता या गोष्टी होणार म्हणून सरकारने ती दिशा व काही आशा दाखविली तर एकट्या महाराष्ट्रातहि २५ हजार सैनिक उभे राहतील !” माँटेग्यू साहेबाकडे होमरूलचा अर्ज दाखल केल्यावर इकडे त्यासंबंधाने विशेष काही करण्याचे राहिले नव्हते व जे काही उरले सुरले राहिले होते ते इकडील लोक करीतच होते. माँटेग्यू यानी तरी स्वतः अर्ज व भेटी घेण्यापलीकडे निश्चित काही केले नव्हते. हे अर्ज व शिष्टमंडळांच्या कैफियतींचे भारे घेऊन