पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६ लो० टिळकांचे चरित्र भाग ३ मंडपात टिळकांचे व्याख्यान होऊन डेप्युटेशन फंडाकरिता ४५०० ची देणगी देण्यात आली. ता. २१ रोजी दोन प्रहरी टिळक भंडाऱ्याहून नागपुरास आले व तेथे त्यानी एक दिवस स्वस्थपणे मुक्काम केला. दौन्याच्या या शेवटल्या २ - ३ दिवसात कार्यक्रमाची थोडी घालमेल झाली. याचे कारण असे की टिळकाना ता. २३ रोजी दिल्ली येथे जाऊन ऑ. इं. काँ. कमिटीच्या सभेला हजर राहावयाचे होते. या सभेत काँग्रेसतर्फे विलायतेला शिष्ट- मंडळ पाठविण्याची वाटाघाट होणार होती. पण दिल्ली येथे टिळकाना जाण्याची यापूर्वी सरकारी हुकुमाने मनाई झाली होती ती मनाई अमलात असताच माँटेग्यू साहेबानी दिल्ली येथे अनेक शिष्टमंडळांच्या भेटी घेतल्या. तेव्हा दिल्ली येथे जाण्याला त्याना तात्पुरती परवानगी मिळाली होती. अशीच परवानगी फिरून मिळावी म्हणून त्यानी दिल्लीच्या कमिशनरला तार केली होती. पण त्याचे उत्तर 'नाही ' असे आले. ते टिळकाना नागपुरास पहिल्या खेपेस मिळाले. यानंतर फिरून त्यानी दुसरी तार हिंदुस्थानसरकारच्या होम मेंबरला व व्हाईसराय याना केली. उत्त- राची वाट पाहण्यात टिळकाना एक दिवस मोडावा लागला. म्हणून त्यात हे आयत्या वेळचे काही कार्यक्रम घेण्यात आले आणि थोडीशी घालमेलहि झाली. अखेर अपिलाच्या तारेचेहि उत्तर 'नाही' असेच आले. तेव्हा ता. २२ रोजी टिळक दुपारी नागपुराहून मेलने निघाले. सायंकाळी ४॥ वाजता धामणगावास मुक्काम झाला. तेथेहि सभा वगैरे होऊन हजार दोन हजारांची वर्गणी देण्यात आली. रात्री धामणगावाहून टिळक निघाले ते सकाळी दहा वाजता वरणगाव येथे आले. हाहि कार्यक्रम आयत्या वेळी ठरविलेला होता. येथेहि भर दोन प्रहरी उन्हात सभा करावी लागली. कारण लोकाना १०-१२ तासहि आगाऊ वर्दी मिळाली नाही. वरणगावाहून टिळक ४|| वाजता निघाले ते भुसावळेस ५ । वाजता आले. लगेच ६ वाजता सभा झाली. सभेच्या शेवटी शे. भगवानदास यानी तीन हजा- रांची थैली अर्पण केली. नंतर भोजन वगैरे उरकून टिळक आगगाडीत बसले २४ रोजी सकाळी मुंबईस पोहोचले व अशा रीतीने वन्हाड नागपुराकडील हा अपूर्व उत्साहाचा दौरा समाप्त झाला. बऱ्हाड नागपूरच्या दौऱ्यात स्वराज्याच्या मागणीबरोवर लष्कर भरतीच्या प्रश्नावरहि टिळक ओघाने बोलत असत. या बाबतीत सरकाराने टिळकांच्या प्रय- नाना साहाय्य न करता उलट विरोध कसा केला याविषयी खऱ्या प्रकाराचे वर्णन पूर्वी दिलेच आहे. पण या प्रकारावर टिळक आपल्या भाषणातून जी टीका करीत तिचे सरकाराला वैषम्य वाटले. या वैषम्याची परिस्फुटता या दौन्यात झाली. यव- तमाळचे डे० कमिशनर मि. चॅपमन यानी स्थानिक स्वराज्यसंघाला लिहून कळ- विले की “ टिळकांचे काही उद्गार सैन्य भरतीला उत्तेजन देणारे असे नसतात. म्हणून पुढे सभा भरवावयाच्या तर त्यात उत्साहभंग करणारी अशी भाषा सरकार बोलू देणार नाही. एखाद्या वक्त्याला आपण सैन्य भरतीला प्रत्यक्ष उत्तेजन द्यावे