पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ टिळकांचा मोठा दौरा ३५ होते व दुसऱ्याचे स्वराज्य येण्याच्या मार्गाला लागले आहे अशी मार्मिक कोटी एकाने केली. पांढरकवड्याहून फिरून वणीच्या मार्गाने टिळक वरोडा येथे सायं. काळी सहा वाजता पोहोचले. येथे हौशी लोकानी मोटारी बाजूला सारून उघड्या बैलांच्या रथातून मिरवणूक काढली. येथेहि मुकुंदराव पाटील ऑनररी मॅजि- स्ट्रेट यांच्या हस्ते मानपत्र व २५०० रु. ची थैली देण्यात आली. चांदा वणी कडे जाताना टिळक वर्ध्यावरून गेले. परंतु खुद्द वर्धा येथील समारंभ ता. १८ रोजी ठरला होता. चांदा येथील सभा संपवून गंगाधरराव देशपांडे वर्धा येथे बरोबरच्या मंडळीत समाविष्ट झाले. तेथे मोठ्या चौकात व्याख्यान झाले. व त्यानंतर अत्रे वकील यानी ५१०० रु. ची थैली दिली. वर्धा येथे बरोबरच्या मंडळीची पांगापांग झाली. खाडीलकर मुंबईस गेले. गोखले याना काही कामाकरिता कलकत्त्यास पाठविण्यात आले. वामनराव जोशी व गंगाधरराव देशपांडे हे उमरावतीस गेले. व टिळकाना नागपुरकर मंडळीच्या स्वाधीन करण्यात आले. वर्ध्यानंतर जवळच शिंदी येथे पुढचा मुक्काम झाला. दुसरे दिवशी सकाळी शिंदी हिंगणी सेलू वगैरे अनेक गावातर्फे मिळून मानपत्र देण्यात आल्यावर २७६० रु. ची थैली अर्पण करण्यात आली. शिंदीहून टिळक निघाले ते नागपूरास १० ॥ वाजता पोहोचले. नागपूर येथे उमरेड व काटोल येथील पुढारी मंडळी आली व आयत्या वेळचे हे आमंत्रण स्वीकारून टिळक उमरेड येथे दोन वाजता पोहोचले. तेथेहिं मानपत्र व व्याख्यान समारंभ होऊन १६००- १७०० रु. ची वर्गणी स्वराज्यसंघाला देण्यात आली. हा समारंभ उरकून टिळक परत नागपूरास संध्याकाळी सात वाजता आले. शहरात यावेळी प्लेग असल्यामुळे माधवराव पाध्ये वकील यांच्या बंगल्याच्या मैदानात व्याख्यानाची व्यवस्था केली होती. कवि ताम्हनकर यानी स्वागतार्थ पद्ये म्हटल्यावर टिळकांचे व्याख्यान झाले व नागपुरकरातर्फे ९ हजारांची थैली देण्यात आली. त्याच रात्री टिळक काटोल येथे गेले. तेथे पोहोचण्यास अपरात्र झाली. म्हणून दुसरे दिवशी सकाळी व्याख्या- नाचा समारंभ झाला व १४०० रुपये रोख देऊन स्वराज्यसंघाचे १४ तहाहयात सभासद झाल्याचे जाहीर करण्यात आले. परत येताना मोहपा येथे घाईघाईने मानपत्र व थैली देण्याचा समारंभ झाल्यावर टिळक नागपुरास जाऊन तेथून रात्री भंडाऱ्याला गेले. पूर्वी जो कार्यक्रम छापून प्रसिद्ध केला होता त्या वेळी टिळ- काना पोहोचता आले नाही. आणि कोणास काहीच माहीत नसल्याने कोणी सामोरे आले नाही इतकेच नव्हे तर मोटारीला गोखले वकिलांचे घर हुडकीत जावे लागले ! एवढ्या मोठ्या दौऱ्यात हा एक मोठा गमतीचा अपवाद घडला. रात्री ११ नंतर सर्व कार्यक्रमाची रचना. या मुक्कामातील आणखी एक मौज अशी की रात्री नाटकगृहात नाटक सुरू झाले होते. पण अवचित टिळक आल्याची बातमी कळताच प्रेक्षकानी नाटकाला रामराम ठोकला आणि थिएटर ओस पडून नाटक थांबवावे लागले. दुसरे दिवशी सकाळी आठ वाजता जिल्हा परिषदेच्या