पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ लो. टिळकांचे चरित्र भांग ३ वेगळ्या मोटारी करून वाशीमपर्यंत पोहोचविण्याला गेली होती. वाशीम येथे पोहोचताच सभेची तयारी होती. येथेहि मानपत्रसमारंभ व्याख्यान वगैरे झाल्यावर रा. दिघे यानी ३५०० रु ची थैली दिली. एका सुवासिनीने सोमवतीच्या म्हणून १०८ चवल्या दिल्या. ता. १२ रोजी सकाळी वाशीमहून निघून पुसद येथे ११ वाजता पोहोचले. पूर्वी सांगितलेले तापलेल्या वाळवंटातील व्याख्यान येथेच झाले. संध्याकाळचा मुक्काम कारजे येथे झाला. हा गाव श्रीमंतांचा असल्यामुळे तेथील थाहि विशेष श्रीमंतीचा होता. व्याख्यानानंतर गांवकऱ्यानी तीन हजारांची थैली दिली. ता. १३ रोजी सकाळी दहा वाजता टिळक मूर्तिजापूर येथे पोहोचले. येथेहि उन्हाच्या वेळीच व्याख्यान झाले. येथेहि सुमारे दोन अडीच हजारांची थैली नजर करण्यात आली. येथे एक संस्कृतज्ञ पंडित भेटले, त्यानी संस्कृतात भाषण केले व संस्कृत कविताहि अर्पण केल्या. यानंतर पुलगावचा प्रवास आग- गाडीने झाला. येथे नागपुरची मंडळीहि सामोरी आली होती. येथेहि ७०० रु. ची थैली गावकऱ्यानी दिली. पण विशेष आश्चर्य हे की शिवाप्पा नावाच्या एका लिंगायत गृहस्थाने स्वराज्य चळवळीला देवाचा प्रसाद म्हणून आपल्या गळ्या- तील रुप्याचे लिंग काढून दिले ! तेथून ता. १४ रोजी छोट्या गाडीने सर्व मंडळी आर्वी येथे पोहोचली. येथे मुक्काम चिपळूणकर वकील यांजकडे होता. पुण्यातील सुप्रसिद्ध सिताराम हरी चिपळूणकर यांचे हे चिरंजीव. येथे स्त्रियांतर्फे एक व पुरुषांतर्फे एक अशी दोन मानपत्रे देण्यात आली. शेवटी सात हजारांची थैली व शिवाय स्त्री मंडळामार्फत ६०० रु. देण्यात आले. आर्वीहून परत पुनः पुलगावास रात्री विश्रांतीला येऊन दुसरे दिवशी सकाळी ८ वाजता सर्व मंडळी वर्ध्यास पोहोचली. तेथून दोन प्रहरी बारा वाजता वरोडा येथे जाऊन जेवणखाण करून तिसरे प्रहरी टिळक हे चांदा येथे पोहोचले. रात्री गंगाधरराव देशपांडे यांचे अध्यक्षतेखाली सभा झाली. म्यु. प्रेसिडेन्ट चेंडके वकील यानी मानपत्र व सहा हजारांची थैली अर्पण केली. दुसरे दिवशी चांदा जिल्हा परिषदेचे काम सुरू होते तेथे काही वेळ घाल- बून टिळक वणी येथे गेले. येथील कार्यक्रमात पुढारीपण बापूजी अणे यांजकडे होते. कारण हा त्यांचा मूळ गाव. येथेहि तीन हजारांची थैली अर्पण करण्यात आली. वणीहून टिळक पांढरकवडा येथे गेले. येथेहि दोन प्रहरी बारा वाजताच व्याख्यान देण्याचा प्रसंग पडला. प्रथम केळापूर तालुक्यातील नागरिकांतर्फे मान- पत्र दिल्यावर गद्रे वकील यानी ३७०० रु. ची थैली अर्पण केली. पांढरकवडा या गावी दुसरे बाजीराव पळ काढीत असता गेले होते असे नमूद आहे. अर्थात् हा विनोदाचा विषय असल्यामुळे स्वराज्य घालविण्याला निघालेले बाजीराव व मिळविण्याला निघालेले टिळक या दोहोंची तुलना भाषणातून झाली ! स्वराज्य हेच दोघांच्या धावपळीचे कारण. पण एकाचे स्वराज्य जाण्याच्या पंथाला लागले