पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भांग ३ टिळकांचा माठा दौरा ३३ वाटेतल्या वाटेत बऱ्हाणपुरचा कार्यक्रम झाला. नंतर भुसावळेवरून रात्री १२ वाजता मंडळी मलकापुरास जाऊन पोहोचली. तेथील वकील पिंपळीकर याजकडे मुक्काम होता. ता. ७ रोजी सकाळी शेट राधाकिसन यांच्या मळ्यामध्ये सभा झाली. मलकापुरकरानी चार हजार रुपयांची थैली अर्पण केली. ता. ७ रोजी आगगाडी सुटून मोटारचा प्रवास सुरू झाला. एकंदर चार मोटारी बरोबर होत्या. पैकी आघाडीच्या मोटारीतून वामनराव जोशी दवंडे बल्लाळ वगैरे मंडळी पुढच्या मुक्कामाला जाऊन आगाऊ व्यवस्था करीत. मलकापुराहून पहिला मुक्काम बुल- ढाण्यास झाला. आण्णासाहेब पिंप्रीकर वकील यांचे घरी तळ पडला. सायं- काळी व्याख्यान झालें. बापट बकील हे अध्यक्ष होते. शेवटी सौ० जानकीबाई कानीटकर यानी भगिनी मंडळाच्या स्वराज्यसंघाच्या अधिकारी म्हणून जमविलेली वर्गणी टिळकापुढे ठेविली. बुलढाण्यानंतर चिखली येथील मुक्काम झाला. नंतर खामगाव आले. तेथे मानपत्र समारंभ होऊन चांदे वकील यानी ६७०० रुप- यांची थैली नजर केली. तसेच कोणी जोगळेकर भटजीनी आपली ५०० रुपयांची विम्याची पॉलिसी स्वराज्यसंघाला दिली ! ता. ९ रोजी खामगावाहून दौरा नांदुरा येथे गेला. शे० नथमलजी है सभेचे अध्यक्ष होते. काळेले वकील यानी नांदुऱ्यातर्फे एक हजार रुपये दिले. याच्या पुढील मुक्काम जळगाव जामोद येथे पडला. वाटेत नदीच्या वाळवंटात अडचण होती ती आसपासचे लोक येऊन त्यानी दूर केली. येथील मुक्काम पांडुरंग दिनानाथ पुंडलीक याचे घरी होता. येथेहि पांच हजार रुपयांची थैली देण्यात आली. जळगाव येथील व्याख्यान संपून टिळक मंडपातूनच निघाले ते रात्री रोगावास गेले. वाटेत एका नदीवर एका चांभाराने कनवटीचे दोन रुपये काढून टिळकांच्या हातावर ठेवले व नदीपार जाण्याच्या व्यवस्थेकरिता गाडी उभी राहिली तेव्हा सहजच त्याने टिळकाशी १०/५ मिनिटे बोलण्याचा आनंद सेवन केला ! शेगावापासून तेव्हाऱ्याचा मार्ग बराच त्रासदायक होता. मोर्णा व पूर्णा या दोन नद्या वाटेत लागतात. पैकी पूर्णेवर लोकानी शेकडो वाळूची पोती टाकून त्यावर फळ्या पत्रे हंतरून मोटारीकरिता लष्करी थाटाचा पूलच बनविला होता. दोन प्रहरी ११ वाजता मंडळी तेल्हारा येथे पोहोचली व लगेच तेथे व्याख्यान झाले, तेल्हायातर्फे १७०० रु. व भगिनी समाजातर्फे सुशिलाबाई जोशी यानी ३०० रु. अशा देणग्या स्वराज्यसंघाला दिल्या. ता. १० रोजी सायंकाळी ४ वाजता टिळक अकोट येथे पोहोचले. तेथील समारंभ विशेष थाटाचा झाला. व गावकऱ्यानी स्त्रीपुरुषातर्फे सुमारे ४८०० रुपयांची थैली दिली. ता. ११ रोजी अकोटहून टिळक निघाले ते दुपारी १०॥ वाजता अको- ल्यास पोहोचले. रा. ब. महाजनी यांच्या बंगल्यावर मुक्काम झाला. व्याख्याना- नंतर वासुदेवराव चिपळूणकर यानी ४३०० रु. ची थैली दिली. दोन प्रहरी तीन वाजता मंडळी वाशीमकडे निघाली. छोटे महाजनी दाते वकील वगैरे मंडळी