पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ लो० टिळकांचे चरित्र भाग ३ म्हणालो " आता हा चावडीत जाऊन लोकाना सव्वा हात खोट्या गोष्टी सांगेल. " त्याचे काल्पनिक भाषण मी बोलून दाखविले. तेव्हा दंतकथाहि अशाच निर्माण होतात हा सिद्धांत टिळकानी समजावून सांगितला. वन्हाडच्या दौऱ्यातच अकोट येथे व्याख्यानात व्युरॉक्रसीचे वर्णन करता करता नोकरशाही' हा शब्द मनात सहज बनून टिळकांच्या तोंडी आला. तात्पर्य " या दौन्यात नुसता मैलो- गणती प्रवास झाला नसून बुद्धीला उद्बोधक असे अनेक प्रसंग घडले. "" खापर्ज्यानी मार्मिकपणे वर्णन केलेला हा दौरा १९१८ च्या फेब्रुवारी ता. ५पासून २० पर्यंत सुरू होता. इतक्या थोड्या अवधीत फार मोठा प्रवास करावयाचा म्हणून मुक्काम ठरविण्याकरिता वामनराव जोशी यानी जिल्ह्याजिल्ह्याचे नकाशेहि बरोबर पुण्यास आणले होते व त्यावरून कार्यक्रम ठरविण्यात आला. रोज प्रवास ३/४ तासाहून अधिक नाही व व्याख्यान एकाहून अधिक नाही अशा अटी टिळकानी घातल्या पण त्या पाळल्या गेल्या नाहीत. दौरा ठरविण्याकरिता पुण्यास पुढारी गेले असे ऐकताच बन्हाड नागपूर भागातील शेकडो गावानी तारा व पत्रे पाठवून आपल्या गावी मुक्काम ठरविण्याचा आग्रह केला. एका गावच्या पुढाऱ्याने असे लिहिले की, " या दौऱ्यात आमचा गाव तुम्ही गाळला तर तो जाळला असे आम्ही म्हणू." पण पंधरा दिवसात किती गावे घ्यावयाची व किती मुक्काम करावयाचे याची मर्यादा दुस्तर होती. ती सांभाळून कार्यक्रम आपल्या- कडून ठाकठीक करून मंडळी पुढील तजविजीला निघून गेली. लोकाना आगाऊ सूचना असावी म्हणून मंगळवार ता. ५ ला रात्री मुंबईहून कलकत्ता मेलने निघाल्यापासून गुरुवार ता. २१ रोजी पुण्यास परत येण्याकरिता मध्यरात्री भंडा- न्याहून निघेपर्यंत गावोगावचा कार्यक्रम छापून त्याच्या हजारो प्रती ठिक- ठिकाणी पाठविण्यात आल्या. कोठेहि कार्यक्रम लांबवू नये टिळकाना लास देऊ नये ठरल्याबाहेर कार्यक्रमाचा आग्रह करू नये अशी सूचना व विनंति छापील हस्तपत्रकात केली होती. शिवाय ती न पोचतील अशा गावच्या लोकाना माहिती व्हावी म्हणून आदल्या केसरीत मुद्दाम स्फुटे लिहून लोकानी कसे वागावे याविषयी संपादकानी सूचना दिल्या होत्या. दौयाला असा प्रत्यक्ष प्रारंभ खामगावापासून झाला. पण खरा प्रारंभ आधी मुंबईपासूनच झाला. कारण ४ तारखेला सायंकाळी कोळशाच्या व्यापा- यानी टिळकाना पानसुपारी केली व शेट मुरारजी यानी ५७११ रुपयांची थैली टिळकाना नजर केली. या समारंभाला म० गांधीहि हजर होते. खांडव्यास वयो- वृद्ध पुढारी हरिदास चतर्जी यांच्या अध्यक्षतेखाली सभा व व्याख्यान झाले. १८९२ साली स्वामी विवेकानंदांच्या सत्काराला खांडव्यास मोठी सभा भरली होती त्याची फिरून लोकाना आठवण झाली. येथील व्याख्यान टिळकानी मोडक्या तोडक्या हिंदीतच दिले. कारण व्यवस्थापकानी छापील कार्यक्रमात आगाऊच तसे लिहून टिळकावर मात केली होती. ता. ६ रोजी दोन अडीच तासामध्ये