पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ टिळकांचा मोठा दौरा ३१ ऐकणारे लोक त्यालाच वेडे म्हणत. निदान तो अर्थवाद असे ठरवीत. व्याख्यान संपून घरी गेल्यावर त्याना खरोखरीच शीण किती येतो हे कोण पाहणार ? वाशिमहून कारंजा हा प्रवास १२५ मैलांचा तो एका दिवसात उरकावा लागला. सकाळी १०॥ वाजता आगेमागे दोन व्याख्याने पुसद येथे झाली. पैकी दुसरे नदीच्या तापलेल्या वाळवंटात दोन प्रहरी १२ पासून || वाजेपर्यंत म्हणजे अर्धातास झाले. फिरून ३-३ || ला मोटारी निघाल्या त्या कारंज्यास रात्री ९ वाजता पोहोचल्या. बाटभर श्रमाने टिळक झोपेच्या गुंगीतच पडले होते. रात्री व्याख्यान देण्याचे टिळकांच्या जिवावर आले तेव्हा त्यानी मंडपात नुसते येऊन जावे, एवढेच नव्हे तर दुसरे दिवशी सभा वगैरे काही व्हावयाची नाही मंडपात व्याख्याने इतरांचीच होतील, असे हडतून खडसून ठरले असता टिळकाना व्याख्यानाला उभे राहावे लागले व ते ५५ मिनिटे बोलले, दुसरे दिवशी गावचे लोक विनोदाने त्याना म्हणाले " आपणच करार मोडलात. आपणच बोलू लाग- लात त्याला आम्ही काय करावे ? " " व्याख्याने ऐकण्याला आनंद होत असला तरी टिळकाना श्रम होतात याची जाणीव सुज्ञ लोकाना अगदीच नव्हती असे नाही. पण त्याना असा मोह पडे की टिळकाना थोडे श्रम होतील खरे पण आम्हा दूर गावच्या लोकाना तरी असा प्रसंग कधी लाभणार ? व्याख्यानात बोलण्याचे श्रम म्हणून एरव्हीच्या वेळात जवळचे लोक वादाचा विषयच मुद्दाम टाळीत. पण एखादा विचार सुचला म्हणजे टिळक आपण होऊनच बोलणे काढीत. खामगावाहून जळगावात जाताना प्रेमसुखराय राठी नावाचे गृहस्थ निरोप देण्याकरिता आले. त्यांची ओळख करून दिल्यावर मोटार चालू झाली. तेव्हा टिळक म्हणाले " काल तुम्ही लोकानी अनेक नावावर कोट्या केल्या. या गृहस्थाचे नाव मात्र त्यातून वगळले गेले. राठी हा राष्ट्रीय शब्दाचा अपभ्रंश होय. " अशी प्रस्तावना करून राष्ट्रावरून राष्ट्रधर्म राष्ट्र- धर्मावरून धर्म धर्मावरून संस्कृति संस्कृतिवरून परिस्थिती असे विषय निघून धर्माच्या परकीयानी केलेल्या व्याख्या इकडील तत्त्ववेत्त्यानी केलेल्या व्याख्या वगैरेची उजळणी झाली. असेच एकदा मोटारीत बुद्धी व स्फूर्ती यासंबंधी सहज चर्चा निघाली. त्यावरहि टिळकांचे धावते प्रवचन बराच वेळ चालू राहिले. व त्यानी आपला असा सिद्धांत सांगितला की विवेचक बुद्धी व स्फूर्ति ही एकाच मनुष्यात नांदू शकतात. राममोहनरायसारखे लोक हे जितके तार्किक तितकेच श्रद्धाळू व भावनामय असत. पण त्यांनी काढलेल्या ब्रह्मसमाजाचा मूळ पाया स्फूर्तीपेक्षा बुद्धीवर अधिक आणि बंगाली लोक तर जात्या भावनाप्रधान म्हणून बंगल्यात ब्राह्मधर्म फारसा रुजला नाही असे टिळक म्हणाले. एकदा दंतकथेच्या उगमावर अशीच चर्चा झाली. एक ठिकाणी एक मुसलमान गृहस्थ टिळकाना भेटून हार घालून चार शब्द बोलून परत गेला. तेव्हा खापर्डे म्हणतात मी थट्टेने टि० उ...१५