पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० लो० टिळकांचे चरित्र भाग ३ पाहात बसत. गीतांजलींचा कर्ता स्वतःचे वर्णन करतो ते या मार्गप्रतीक्षा कर- या प्रेक्षकाना लागू पडते. "सकाळ गेली दुपार गेली तरी मी वाटेवरच्या भिकाऱ्यासारखा बसलोच आहे. गवतावर बसून मी वाटेकडे डोळे लावले. पण वेळ ओसरत चालला. आणि देवा तुझ्या गाडीच्या चाकाचा शब्दहि अजून ऐकूं येत नाही ! "मोटार थांबली म्हणजे जणूं काय टिळकांचा देह आणि मोटार ही एकच मानून मोटारीच्या सापडेल त्या अंगाला स्पर्श करून टिळकांच्याच पायाला हात लागला अशा भावनेने ते तो आपल्या कपाळाला लावीत. आमची विनंति कदा- चित लोकाना खोटी वाटेल म्हणून स्वतः टिळक गयावया करून लोकाना सांगत की खरोखरच माझा पाय दुखतो आहे व हे सांगतात ते काही खोटे नाही. असे म्हणून त्यानी पाय पुढे करून त्यावरील जखमेची पट्टी दाखवावी. पण त्याने हि काम भागत नसे. तेव्हा पायापेक्षा हाताचे दर्शन अधिक चांगले अशी एक नवी म योजून आम्ही ती लोकाना पटविण्याचा प्रयत्न करू लागलो. पण दर्शनाच्या चाबतीत हात आणि पाय यातील फरक लोकाना जुना माहीत तोच सांगून त्यानी आम्हाला मोडून काढावे. आडमार्गाला दिवे नसत तेव्हा त्याऐवजी पाल्यापाचो- ळ्याचे ढीग रचून मोटार येताच कोणी ते पेटवून देत मग काय उजेडच उजेड ! टिळक स्वराज्याच्या चळवळीकरिता हिंडत आहेत व लोक त्याकरिता वर्गणी गोळा करीत आहेत या माहितीमुळे, रस्त्याजवळ असलेल्या गावाकडे थोडी वाकडी वाट करून टिळकानी यावे म्हणून कोणी म्हणत ' आपल्या चळवळीला वर्गणी द्यावयाची आहे गावात चलाल तर देऊ.' पण व्यवस्थापक मंडळी अशा आयत्या वेळच्या सूचना मोडून काढीत. ""या दौन्यामध्ये टिळकांवरील लोकप्रियतेचे आक्षेप व त्यांचा खरा परिहार यांचा उमज पडण्यासारखा होता. लोकप्रियतेचे सोंग कोणी आणून येत नाही व जेथे खरी लोकप्रियता नाही तेथे प्रयत्नाने रचलेले समारंभ फिके पडतात. पण टिळ कांच्या दौऱ्यात कोणी पत्र धाडले नाही कोणी निरोप पाठविला नाही. ते अमुक वेळी येतील किंवा न येतील याची पुरी माहिती नसताही केवळ जमल्यास दर्शन घ्यावे असे म्हणून नुसत्या वदंतेवर लोक जमत. ही लोकप्रियता खरी अकृत्रिम कशी न मानावी ? व अशा अकृत्रिम प्रेमाचा आनंद टिळकानीहि का मानू नये ? टिळकांच्या मांगे देश धावतो या लाक्षणिक म्हणीचे थोडे तरी प्रत्यक्ष गमक त्यांच्या दौऱ्यात कोणासहि पाहावयास मिळाले असते. ज्याच्या डोक्यावर कष्टाच्या धुळीचे कण नित्य पडतात त्याच्या डोक्यावर फुलाच्या पाकळ्या केव्हा केव्हा पडून त्यानी ते कण झाडून टाकल्यास त्यात काय वावगे ? दौन्याचे श्रम होत असूनहि टिळक व्याख्यानाला उभे राहिले म्हणजे श्रमाकडे न पाहता व्याख्यान देत. ते इतके की टिळकांचे वय ६४-६५ पर्यंत आहे त्याना मधुमेहाची व्यथा आहे आणि अलीकडे त्यांची प्रकृति बरी नाही असे कोणी म्हटले तर व्याख्यान