पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ टिळकांचा मोठा दौरा २९ त्यात आपलीहि काही भर घातली होती. २४ अर्जात काही विशिष्ट संस्थाकरिता किंवा जातीकरिता वेगळ्या मागण्या केल्या होत्या पण काँग्रेसच्या मागणीला त्यांची प्रतिकूलता नव्हती. फक्त २४ अर्जात सुधारणांच्या योजनेला विरोध होता. या पैकी ४ अर्ज अँग्लो इंडियन रहिवाशांचे व ५ अँग्लो इंडियन व्यापारी मंडळाचे होते. तसेच ५ मागसलेल्या वर्गांचे व काही मद्रास इलाख्यातील मुसलमानांचे होते. यातील काही संस्था माँटेग्यू साहेब येणार म्हणून मुद्दाम नव्याच तात्पुरत्या बनविण्यात आल्या होत्या ! (१०) टिळकांचा मोठा दौरा ता. २६ जानेवारी रोजी लोणावळे येथे बॅ. मुकुंदराव जयकर यांचे अध्यक्ष- तेखाली पुणे जिल्हासभा भरली. त्यानी आपल्या भाषणात सर्व सामान्य राजकीय प्रश्नाबरोबर मुंबई इलाखा व पुणे जिल्हा यातील स्थितीचे विशेष समालोचन केले. बॅ. जयकर हे मुंबई येथील नागरिक खरे, परंतु पुणे जिल्ह्याशीहि त्यांचा संबंध असून या सभेच्या प्रसंगाने त्यानी महाराष्ट्रातील राजकारणात प्रथमच प्रवेश केला. या परिषदेला टिळक हजर असून तेथे त्यांची व्याख्याने झाली व त्यानंतर ते लव- करच बऱ्हाड नागपुराकडील आपल्या मोठ्या सुप्रसिद्ध दौऱ्यावर निघाले. या दौ-याचा कार्यक्रम सांगण्यापूर्वी प्रस्तावनेदाखल त्याचे थोडेसे वर्णन आगाऊच दिले असता ते वाचकाना आवडेल असे वाटते. आणि सुदैवाने उमरा- वतीचे टिळक भक्त यानी केलेले या दौऱ्याचे एक सुंदर वर्णन उपलब्ध असल्यामुळे तेच सारांश रूपाने येथे देतो. बाबासाहेब खापर्डे हे टिळकांच्या वन्हाडातील दौऱ्यात बरोबर व्यवस्थेला होते. ते लिहितात : - " रात्री ११ नंतर व दोन प्रहरी १-२ तास एवढा वेळ खेरीज करून मी टिळकांच्या सन्निध असे व या काळात टिळकहि मोटारीतून प्रवास करीत असत किंवा व्यासपीठावर उभे राहून बोलत असत. आणि या सर्व काळात त्यांच्या भोवती इतकी गर्दी असे की त्या अवधीतील कोणत्याहि प्रसंगाचे चित्र काढावयाचे तर आधी विकार गर्दी काढावी लागेल व मग त्यात टिळक कोठे आहेत हे हुडकून काढावे लागेल. अशा गर्दीतून टिळकाना काढून नेणे आणणे ही मोठी काळजीची व जिकिरीची गोष्ट होई. टिळकाना मधु- मेहाची व्यथा असल्याने लोकानी गर्दी करू नये अशी सूचना लिहिलेली हस्त- पत्रके वाटली जात असत. पण त्यांचा फारसा उपयोग होत नसे. टिळकाना कष्ट पडावे किंवा इजा व्हावी अशी इच्छा कोण करणार ? पण आपण गर्दी करितो याचा परिणाम तसा होतो हे त्यांच्या ध्यानात येत नसे. केवळ मोठ्या गावांच्या ठिकाणीच अशी गर्दी होत असे असे नाही. तर प्रवासात वांटेवरहि प्रत्यक्ष मुक्काम नसला तरी गाव भेटेल तेथे मोटार थांबवून उभ्या उभ्या तरी मुक्काम करावा लागे. आणि तेव्हा तर मोटारीभोवती इतका गराडा पडे की यातून आता पुढे मोटार कशी न्यावी ही पंचाईत वाटे. दिवसा रात्री वेळी अवेळी मोटारीच्या वाटेवर लोक बाट